विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळाने शाश्वत चुंबक उत्पादनासाठी मे. मिडवेस्ट ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स प्रा. लि.,हैदराबादला मंजूर केले साहाय्य

Posted On: 30 MAY 2024 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2024

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळाने शाश्वत चुंबक उत्पादनासाठी मे. मिडवेस्ट ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स प्रा. लि.,हैदराबादला निधी मंजूर केला आहे. अत्यावश्यक सामग्री आणि तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे तंत्रज्ञान विकास मंडळाच्या केंद्रात हे साहाय्य मंजूर झाले.

ई-गतिशीलता उपयोजनांसाठी अविभाज्य घटक असलेल्या रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेटस आणि निओडीमियम मटेरिअल्सच्या व्यावसायिक उत्पादनात प्रगती करण्यावर हा धोरणात्मक प्रकल्प लक्ष केंद्रित करतो. 

निओडीमियम स्थायी चुंबक अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये जनित्रे आणि विद्युत वाहनांमध्ये प्रणोदन प्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची बाजारपेठ विस्तारण्याचा अंदाज असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादन क्षमतांचे महत्त्व अधोरेखित होते. 

नॉन फेरस मटेरिअल्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटरचे  (लोहेतर सामग्री तंत्रज्ञान विकास केंद्र) संचालक डॉ. के. बाला सुब्रमण्यम यांनी आपल्या भाषणात भारताचा अग्रणी उपक्रम म्हणून या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. 150-170 टन ऑक्साईडमधून 500 टन चुंबकांच्या वार्षिक उत्पादनाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून हा  देशासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा असेल.

स्थानिक संयंत्र आणि यंत्र संरचनेमुळे भांडवली गुंतवणूक कमी लागणार असून यातून प्रकल्पाला फायदा होईल. 

 

* * *

N.Chitale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022215) Visitor Counter : 52