संरक्षण मंत्रालय
नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या महासंचालकांनी लडाख प्रदेशातील माउंट कांग यात्से -II साठी मुला-मुलींच्या गिर्यारोहण मोहिमेला दाखवला हिरवा झेंडा
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2024 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2024
माउंट कांग यात्से -II शिखर सर करण्यासाठी नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) च्या मुला-मुलींच्या गिर्यारोहण मोहिमेला राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे महासंचालक, लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग, यांनी 28 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथून हिरवा झेंडा दाखवला. हे शिखर लडाख प्रदेशात 6,250 मीटर/20,505 फूट उंचीवर आहे आणि 1970 पासून एनसीसी कॅडेट्सची ही 87 वी गिर्यारोहण मोहीम आहे.
या पथकामध्ये एनसीसीच्या संचालनालयातील पाच अधिकारी, 17 कायमस्वरूपी प्रशिक्षक आणि 24 कॅडेट्स (12 मुले आणि 12 मुली) यांचा समावेश आहे. हा चमू जून 2024 च्या अखेरीस माउंट कांग यात्से-II वर चढण्याचा प्रयत्न करेल.
नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या महासंचालकांनी या चमूला यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि युवकांच्या विकासामध्ये राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सची महत्त्वपूर्ण भूमिका आणि विविध साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कॅडेट्सना उपलब्ध केलेल्या संधींचा उल्लेख केला. या मोहिमेदरम्यान येणाऱ्या आव्हानांना धैर्य, साहस, कार्यकुशलता आणि अदम्य भावनेने सामोरे जाण्यासाठी त्यांनी कॅडेट्सना प्रोत्साहित केले.



* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2022008)
आगंतुक पटल : 115