आयुष मंत्रालय

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने आयुर्वेदाचे भविष्य घडविणारा “प्रगती-2024” उपक्रम केला सुरू

Posted On: 28 MAY 2024 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2024

 

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) आज “प्रगती-2024” (आयुर्ज्ञान आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मधील औषधी संशोधन) उपक्रमाला सुरुवात केली. हा उपक्रम आयुर्वेदाच्या सहयोगी संशोधनासाठी अतिशय उपयुक्त संधी देतो. आजच्या संवादात्मक बैठकीचे उद्दिष्ट संशोधनाच्या संधी शोधणे आणि सीसीआरएएस आणि आयुर्वेद औषध उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवणे हा आहे.

यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी आयुर्वेदाच्या विकासात उद्योगाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. नवीन व्यावसायिक आणि स्टार्टअप्सचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढीच्या संधी उपलब्ध करून देत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या क्षेत्राचा विस्तार आणि प्रगती करण्याची क्षमता असलेले उद्योग अधोरेखित केले.

प्रगती-2024 मधील भाषणादरम्यान, सीसीआरएएस महासंचालक  प्रा. रविनारायण आचार्य यांनी आयुष उत्पादनांच्या, विशेषतः आयुर्वेदाच्या भारतात आणि जगभरातील वाढत्या मागणीचा उल्लेख केला. “सीसीआरएएसचे उद्दिष्ट प्रत्येक भागधारकापर्यंत पोहोचायचे आहे आणि म्हणून आम्ही शिष्यवृत्ती देणे सुरू केले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व समजेल. संशोधन आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम सुरू केले आहेत.” असे ते यावेळी म्हणाले.

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021982) Visitor Counter : 95