संरक्षण मंत्रालय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख जनरल मनोज  पांडे  यांना सेवेत  30 जून 2024 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ केली मंजूर.

Posted On: 26 MAY 2024 5:31PM by PIB Mumbai

 

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 26 मे 2024 रोजी लष्करी नियम 1954 च्या नियम 16 अ (4) अंतर्गत लष्करप्रमुख (COAS)जनरल मनोज सी पांडे,   पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी  यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्ती वयापेक्षा (31 मे 2024) एक महिन्याच्या अधिक कालावधीसाठी म्हणजे 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी  दिली आहे. त्यांची 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. डिसेंबर 1982 मध्ये त्यांची अभियांत्रिकी लष्करी तुकडीत (द बॉम्बे सॅपर्स) नियुक्ती झाली. लष्करप्रमुख म्हणून पदभार स्विकारण्यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कामकाज पाहिले होते.

***

S.Kane/S.Naik/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021729) Visitor Counter : 57