संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल जहाज किल्तानची मुआरा, ब्रुनेईला भेट
Posted On:
25 MAY 2024 7:23PM by PIB Mumbai
भारतीय नौदल जहाज किलतान हे 25 मे 2024 रोजी ब्रुनेईमध्ये मुआरा येथे पोहोचले आणि रॉयल ब्रुनेई नौदलाने त्यांचे जोरदार स्वागत केले. ही भेट, भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या दक्षिण चीन समुद्रात परिचालनात्मक तैनातीचा एक भाग आहे. या भेटीमुळे दोन्ही सागरी राष्ट्रांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होईल.
भारतीय नौदल जहाज किल्तानची भेट व्यावसायिक संवाद, क्रीडा सामने, सामाजिक देवाणघेवाण आणि दोन्ही राष्ट्रे आणि नौदलाची सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करणारे समुदाय पोहोच यावर केंद्रित आहे.
भारतीय नौदल जहाज किल्तानची भेट ही व्यावसायिक संवाद, क्रीडा सामने, सामाजिक देवाणघेवाण तसेच दोन्ही राष्ट्रे आणि नौदलांची सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करणारी आहे. भारतीय नौदल आणि रॉयल ब्रुनेई नौदल यांच्यातील सागरी सरावाने या भेटीचा समारोप होईल. दोन्ही नौदले कौशल्यपूर्ण रणनीतीचा अवलंब करतील ज्यामुळे आंतर-कार्यक्षमता वाढेल आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुद्धा होईल.
स्वदेशी रचना असणारी आणि कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (गीआरएसई) यांनी बांधलेल्या चार पी28 अँटी-सबमरीन वॉरफेअर (एएसडबल्यू) कॉर्वेट्सपैकी आयएनएस किल्टन ही तिसरी पाणबुडी आहे.
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021652)
Visitor Counter : 86