दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आयोजित केली नियामाकांच्या संयुक्त समितीची बैठक
Posted On:
22 MAY 2024 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2024
ट्राय (TRAI), अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 21 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथील ट्राय च्या मुख्यालयात नियामकांच्या संयुक्त समितीची (JCoR) बैठक आयोजित केली होती. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), ग्राहक व्यवहार मंत्रालय (MoCA) आणि JCoR चा सदस्य म्हणून ट्राय चे प्रतिनिधी, आणि विशेष निमंत्रित म्हणून दूरसंचार विभाग (DoT) आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी (MHA) या बैठकीला उपस्थित होते. ट्राय चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी बैठकीला संबोधित केले. JCoR हा TRAI द्वारे सुरु करण्यात आलेला एक सहयोगी उपक्रम असून, डिजिटल जगात नियामक परिणामांचा अभ्यास करणे आणि नियमांच्या अंमलबजावणीवर सहकार्याने काम करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
अनसोलिसीटेड कमर्शियल कम्युनिकेशन (UCC), म्हणजेच गरज नसताना पुरवली जाणारी व्यावसायिक माहिती, लोकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरते आणि त्यांच्या गोपनीयतेला बाधा पोहोचवते. फसवणूक करणाऱ्यांद्वारे UCC चा देखील वापर केला जातो. UCC आणि फसवणुकीची प्रकरणे हाताळण्यासाठी दूरसंचार संसाधनांद्वारे अमलात आणण्याजोग्या विविध संभाव्य सहयोगी पध्दती आणि उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. पुढील महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली:
- अनधिकृत 10-अंकी मोबाईल क्रमांक तसेच लँडलाइन नंबरवरून येणारे अनपेक्षित कॉल.
- प्रमोशनल कॉल करण्यासाठी प्रिन्सिपल एंटिटीज (दूरसंचार संसाधनांचा वापर करून व्यावसायिक संवाद करणाऱ्या संस्था) द्वारे 140 सिरीजचा वापर.
- ग्राहक सहज ओळखण्यासाठी प्रिन्सिपल एंटिटीज द्वारे सेवा आणि व्यवहार विषयक कॉल करण्यासाठी 160 सिरीजचा वापर.
- यूसीसी कॉल्स आणि मेसेज रोखण्यामधील प्रिन्सिपल एंटिटीज, विशेषतः BFSI (बँकिंग, वित्त सेवा आणि विमा) क्षेत्रातील संस्थांची भूमिका.
- दूरसंचार सेवा प्रदात्यांनी स्थापित केलेल्या डिजिटल संमती संपादन (DCA) प्रणालीच्या मदतीने, ओटीपी चा वापर करून ग्राहकांकडून योग्य पडताळणीसह सोप्या आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे प्रिन्सिपल एंटिटीज द्वारे, डिजिटल संमती संपादन करणे. DCA, ग्राहकांकडून मिळालेली संमती रद्द करण्याची देखील परवानगी देते.
- सामग्री टेम्पलेट्समध्ये Urls/Apks/OTT लिंक्स/कॉल बॅक नंबरचे व्हाइटलिस्टिंग.
- दूरसंचार संसाधनांचा वापर करून फसवणुकीवर नियंत्रण मिळवणे आणि केवायसी प्रक्रिया अधिक मजबूत करणे.
- विविध मंचाच्या मदतीने माहितीचे आदान-प्रदान
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021374)
Visitor Counter : 71