संरक्षण मंत्रालय

सीडीएस जनरल अनिल चौहान सायबर सुरक्षा - 2024 सरावाच्या वेळी उपस्थित


सैन्य आणि राष्ट्रीय एजन्सींमधील सहकार्य आणि एकात्मता वाढवण्यासाठी झाला सायबर सुरक्षा सराव

Posted On: 22 MAY 2024 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2024

 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी 22 मे 2024 रोजी ‘सायबर सुरक्षा – 2024  सरावाला हजेरी लावली आणि भारताच्या सायबर संरक्षण क्षमतांना बळकट करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

20 - 24 मे 2024 या कालावधीत संरक्षण सायबर एजन्सी द्वारे व्यापक सायबर संरक्षण सराव आयोजित केला जात आहे. सर्व सायबर सुरक्षा संस्थांची सायबर संरक्षण क्षमता अधिक विकसित करणे आणि सर्व भागधारकांमध्ये समन्वय वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.विविध लष्करी आणि प्रमुख राष्ट्रीय संघटनांमधील सहभागींमधील सहयोग आणि एकात्मता वाढवणे  हे या सरावाचे उद्दिष्ट आहे.

यावेळी अनिल चौहान यांनी सायबर क्षेत्रातील सर्व भागधारक एकत्र येण्याची गंभीर गरज आहे, असे अधोरेखित केले आणि भविष्यातील सायबर धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. त्यांनी हा सराव आयोजित करण्यासाठी सहभागी आणि कर्मचारी यांनी दाखविलेल्या समर्पण आणि प्रयत्नांची प्रशंसा केली.

सायबर सुरक्षा सराव - 2024 चे लक्ष्य सहभागींना त्यांची सायबर संरक्षण कौशल्ये, तंत्रे आणि क्षमता वाढवून सक्षम करणे; सर्वोत्तम पद्धती सामायिक करून  एकसंध आणि मजबूत सायबर संरक्षण स्थितीसाठी कार्य करणे हे आहे.त्यामुळे सायबर डिफेन्स फ्रेमवर्कचे नियोजन आणि तयारी यामध्ये  संयुक्तपणे काम करणे आणि समन्वयाला प्रोत्साहन देईल.वाढत्या महत्त्वाच्या सायबर क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांच्या वचनबद्धतेला पुष्टी देणारा हा कार्यक्रम आहे.

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021371) Visitor Counter : 56


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil