शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी जोधपूरने उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील परिणामांवरील अतिशय महत्वाचे संशोधन केले प्रकाशित

Posted On: 21 MAY 2024 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मे 2024

जगभरातील लाखो लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणारे वायू प्रदूषण हे एक गंभीर जागतिक आव्हान आहे. या समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) जोधपूरच्या संशोधकाने नेचर कम्युनिकेशन्स जर्नल या पत्रिकेमध्ये आपले महत्त्वपूर्ण संशोधन प्रकाशित केले आहे, ज्यात उत्तर भारतात,मानवी आरोग्यावर हानीकारक परिणाम करणाऱ्या पार्टिक्युलेट मॅटरच्या (पीएम) स्रोतांवर आणि घटकांवर प्रकाश टाकला आहे.

एकूणच पार्टिक्युलेट मॅटर  कमी झाल्याने आरोग्यावर होणारे हानीकारक परिणाम कमी होतील या सामान्य समजाच्या विरुद्ध, हा सर्वसमावेशक अभ्यास, बायोमास आणि जीवाश्म इंधन सारख्या अकार्यक्षम ज्वलन प्रक्रियांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत, रहदारीच्या ठिकाणी पीएम-चे संबंधित प्रमाण प्रभावीपणे कमी केल्यास उत्तर भारतात त्यांचे आरोग्यावरील हानीकारक संबंधित परिणाम कमी होतील -असे सहायक प्राध्यापक आणि लेखाच्या प्रमुख लेखिका डॉ.दीपिका भट्टू, यांनी म्हटले आहे.

प्रगत एरोसोल मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्र आणि डेटा विश्लेषणाचा  उपयोग करून, हा अभ्यास दिल्लीच्या आत आणि बाहेर अशा पाच इंडो-गंजेटीक पठारावर केला गेला आणि असे आढळून आले की संपूर्ण प्रदेशात एकसमान उच्च पीएम कॉन्सन्ट्रेशन असले  तरी स्थानिक उत्सर्जनाचे स्रोत आणि निर्मिती प्रक्रिया यांमुळे प्रदूषित पीएमची रासायनिक रचना बदलते.दिल्लीत,थेट वाहतूक एक्झॉस्ट,निवासी हीटिंग आणि वातावरणात तयार होणारे जीवाश्म इंधन उत्सर्जनाच्या ऑक्सिडेशनमुळे,अमोनियम क्लोराईड आणि ऑर्गनिक एरोसोल यांचे पीएमच्या प्रदूषणावर वर्चस्व आहे.

याउलट, दिल्लीच्या बाहेर, अमोनियम सल्फेट आणि अमोनियम नायट्रेट, तसेच बायोमास बर्निंगच्या व्हेपर्समधे  दुय्यम ऑर्गनिक एरोसोल, यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तथापि, स्थान विचारात न घेता बायोमास आणि जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून होणारे ऑर्गनिक एरोसोल, वाहतुकीतून होणारे  उत्सर्जन हे,पीएम ऑक्सिडेटिव्हमधे मुख्य योगदानकर्ते आहेत, ज्यामुळे या प्रदेशात आरोग्यावर पीएम-संबंधित होणाऱ्या हानीकारक परीणामांना कारणीभूत ठरतात,हे या अभ्यासातून ठळकपणे समोर आले आहे.

भारतीय पीएम 2.5 च्या ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियलची तुलना आशिया-पॅसिफिक आणि युरोपीय प्रदेशातील देशांशी केल्यास चिंताजनक निष्कर्ष दिसून येतात. भारतीय पीएमची ऑक्सिडेटिव्ह क्षमता जागतिक स्तरावर सर्वाधिक म्हणून चिन्हांकित झाली असून चीनमधील आणि युरोपियन शहरांपेक्षा पाचपटीने पुढे गेली आहे.

Associate Professor Dr. Deepika Bhattu, IIT Jodhpur

 

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2021269) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi_RJ , Tamil