वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

युलिप कार्यशाळेने भारताची लॉजिस्टिक्स क्षमता वाढवण्यासाठी राज्यांना आणले एकत्र

Posted On: 20 MAY 2024 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2024

युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (युलिप ) भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यात सातत्याने अग्रेसर आहे. आज, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन  विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वाणिज्य भवन येथे आयोजित या कार्यक्रमात तेलंगणा, केरळ, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, नागालँड आणि राजस्थान यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच अनेक उद्योग संघटना, उद्योग  आणि स्टार्ट-अप कार्यशाळेत सहभागी झाले होते .

यावेळी राजेश कुमार सिंह यांनी युनिफाइड लॉजिस्टिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्यांमध्ये सहकार्य आणि एकात्मता वाढविण्यात युलिपच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. "युलिप राज्यांना त्यांची लॉजिस्टिक व्यवस्था वाढवण्याची अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देते."

कार्यशाळेदरम्यान,राजेश कुमार सिंह यांनी एक युलिप  पुस्तिका देखील प्रकाशित केली ज्यात विविध खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि स्टार्टअप्स युलिप एपीआयचा कसा वापर करतात हे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले आहे तसेच लॉजिस्टिक क्षेत्रावर या प्लॅटफॉर्मचा परिवर्तनात्मक  प्रभाव देखील अधोरेखित केला.

या कार्यक्रमाने उद्योजक आणि हितधारकांना त्यांचे अनुभव आणि विचार सामायिक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याव्यतिरिक्त, विविध मालमत्ता विकसित करण्यासाठी विविध मंत्रालये आणि विभाग पीएम गतिशक्ती एनएमपी  साधनांचा वापर कसा करतात यावर देखील चर्चा करण्यात आली.

युलिप बद्दल:

युलिप हा एक डिजिटल गेटवे आहे जो उद्योजकांना एपीआय -आधारित एकत्रीकरणाद्वारे विविध सरकारी यंत्रणांमधून लॉजिस्टिक-संबंधित डेटासेट मिळवण्यास  अनुमती देतो. सध्या, 118 API द्वारे 10 मंत्रालयांच्या 37 प्रणालींशी प्लॅटफॉर्म  जोडलेला आहे, ज्यामध्ये 1800 डेटा फील्ड समाविष्ट आहेत. युलिप पोर्टलवर (www.goulip.in) 900 हून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली असून युलिप मधील खाजगी क्षेत्राचा सहभाग त्याचा प्रभाव वाढवण्यात महत्त्वाचा ठरला आहे.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2021150) Visitor Counter : 62


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu