संरक्षण मंत्रालय
गुणवत्तापूर्ण मुलग्यांना बॉयज् स्पोर्टस् कंपनी, दारूगोळा केंद्र, नाशिक रोड कॅम्प इथे ताएक्वांडो क्रीडा प्रकारात 17 ते 19 मे 2024 या काळात प्रवेशाची संधी देण्यासाठी अखिल भारतीय खुली भरती रॅली
Posted On:
13 MAY 2024 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2024
1.बॉयज् स्पोर्टस् कंपनी, दारूगोळा केंद्र, नाशिक रोड च्या वतीने ताज्या दमाच्या तसेच क्रीडा कौशल्य सिद्ध केलेल्या खेळाडूंची क्रीडा कॅडेट्स म्हणून प्रवेशाची संधी देणारी भरती रॅली 17 ते 19 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दखलनीय कामगिरी करणाऱ्या मुलग्यांना ताएक्वांडो क्रीडा प्रकारात नाशिक रोड छावणीतील बॉयज् स्पोर्टस् कंपनी (बी.एस.सी.) त प्रवेशासाठी निवडले जाणार आहे.
2.पात्रतेचे निकष
(a) वय – 17 मे 2024 रोजी 8 ते 14 वर्षांदरम्यान. (17 मे 2008 ते 17 मे 2014 या काळात जन्म झालेले उमेदवार)
(b) खाली दिलेले उंची आणि वजनाचे निकष बी.एस.सी.त प्रवेशासाठी लागू आहेत.
Ser
|
Age at entry level
|
Age (Yrs)
|
Height (Cms)
|
Weight
|
(a)
|
08-14 years
|
08
|
134
|
29
|
09
|
139
|
31
|
10
|
143
|
34
|
11
|
150
|
37
|
12
|
153
|
40
|
13
|
155
|
42
|
14
|
160
|
47
|
(c) या निकषांपासून सामान्यतः फारकत घेतली जाणार नाही. मात्र, अपवादात्मक कौशल्यपूर्ण उमेदवार ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे, पदके मिळवली आहेत त्यांच्यासाठी शारिरीक निकषांबाबत लवचिकतेचे धोरण वापरले जाईल.
(d) वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्ती - लष्कर क्रीडा आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी आणि विशेष तज्ञ निश्चित करतील.
(e) शरीराच्या कोणत्याही भागावर कायमस्वरुपी गोंदवलेले (टॅटू) असलेल्या अर्जदारांची निवड केली जाणार नाही.
3. दारूगोळा केंद्रातील बी.एस.सी.मध्ये महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील. निवडीच्या वेळी उमेदवारांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे –
(a) जन्म आणि मृत्युंबाबत नोंदणी विभाग अथवा महानगरपालिकेने दिलेल्या जन्माच्या दाखल्याची मूळ प्रत.
(b) जातीचा दाखल्याची मूळ प्रत
(c) शैक्षणिक प्रमाणपत्र/शाळेच्या गुणपत्रिकेची मूळ प्रत
(d) ग्राम प्रधान/शाळेने दिलेले चारित्र्याच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत
(e) तहसीलदार/उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या रहिवासी/कायम वास्तव्याच्या दाखल्याची मूळ प्रत
(f) अलीकडेच काढलेल्या रंगीत फोटोंच्या सहा प्रती
(g) जिल्हा स्तर किंवा त्याहून वरील स्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभागाच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत
(h) आधार कार्डाची मूळ प्रत
टीप – मूळ प्रती तपासल्या जातील आणि वरील प्रत्येकाची एक प्रमाणित प्रत अर्जाबरोबर जमा करून घेतली जाईल.
4. रॅलीच्या काळातील निवास आणि भोजन व्यवस्था. निवड रॅलीसाठी उमेदवारांनी आपापल्या खर्चाने उपस्थित राहाणे अपेक्षित आहे. अर्जांच्या छाननीच्या काळात उमेदवार व त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींनी नाशिकमध्ये निवास आणि प्रवासाची आपापली सोय करणे अपेक्षित आहे.
5.नोंदणीसाठी उपस्थित राहण्याची वेळ.
(a) स्थळ – दारूगोळा केंद्र, नाशिक रोड छावणी
(b) तारीख – 17 मे 2024
(c) वेळ – सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरू.
6. निवड. एस.एम.सी., पुणे आणि बी.एस.सी. यांचे या कामासाठी समर्पित पथक पूर्णपणे पारदर्शक वातावरणात चाचण्या/निवड प्रक्रिया घेतील. इच्छुक उमेदरावारांना विनंती आहे की त्यांनी संबंधित अधिकारी, निवड चाचणी, बी.एस.सी., दारूगोळा छावणी, नाशिक यांच्याकडे सकाळी 7.00 वाजता नोंदणीसाठी उपस्थित राहावे.
7. संपूर्ण निवड प्रक्रियेला साधारणपणे तीन दिवस लागतील.
8. निवड झालेल्या मुलग्यांना बी.एस.सी., दारूगोळा केंद्र, नाशिक रोड छावणीत भरती होण्यासाठी त्यांची निवड झालेल्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. या संदर्भात निवड झालेल्या उमेदवारांना पत्र पाठवून कळवले जाईल.
9. अधिक माहितीसाठी संपर्क –
कमांडिंग ऑफिसर
आर्मी बॉयज् स्पोर्ट्स कंपनी
दारूगोळा केंद्र, नाशिक रोड छावणी
पिन – 908800
c/o 56 ए.पी.ओ.
दूरध्वनी क्रमांक – (विस्तार क्र. 6098 व 6280), ताएक्वांडो प्रशिक्षक – 7005053882
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2020460)