खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे खनिज बिदेश इंडिया लिमिटेड (KABIL) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे खाण सचिवांनी केले उद्घाटन

Posted On: 11 MAY 2024 1:52PM by PIB Mumbai

 

खाण मंत्रालयाचे सचिव व्ही एल कांथा राव यांनी आज नवी दिल्लीतील संसद मार्ग येथे खनिज बिदेश इंडिया लिमिटेड (काबिल) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी खाण मंत्रालयाचे आणि काबिलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काबिल ही NALCO, HCL आणि MECL तसेच खाण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या CPSE याद्वारे स्थापन केलेली एक संयुक्त उद्यम कंपनी आहे. परदेशातील अतिशय महत्त्वाची आणि प्रमुख उद्योगांसाठी उपयुक्त असलेली खनिज संपत्ती ओळखणे, शोधणे, संपादन करणे आणि विकसित करणे हे महत्त्वाचे कार्य सोपविण्यात आले आहे.

दिल्ली येथे काबिलच्या कार्यालयाचे उद्घाटन भारताची खनिज सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या नवीन युगाचे प्रतीक आहे, असे खाण सचिवांनी आपल्या उद्घाटन भाषणात नमूद केले.  उत्कृष्टतेसाठी दृढ वचनबद्धतेसह काबिल "मेक इन इंडिया" आणि "विकसित भारत" तसेच निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्रमुख उद्योगांसाठी उपयुक्त असलेल्या खनिजांच्या क्षेत्रात भारताची वाढ आणि आत्मनिर्भरता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास तयार आहे.

काबिलच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 15 जानेवारी 2024 रोजी CAMYEN सोबत अन्वेषण करारावर स्वाक्षरी करणे. या कराराने काबिल ला अर्जेंटिनामधील पाच लिथियम ब्लॉक्ससाठी विशेष उत्खनन अन्वेषण अधिकार प्रदान केले, ज्यामुळे लिथियमचा स्थिर पुरवठा उपलब्ध होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. हा लिथियम इलेक्ट्रिक वाहनांसह विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या बॅटरीच्या उत्पादनातील प्रमुख घटक आहे.

जी 2G सामंजस्य करार (खाण मंत्रालय आणि DSIR यांच्यात) स्वाक्षरी करून उत्पादक असलेल्या ऑस्ट्रेलियासोबत भारताचे सहकार्य देखील आहे )

सरकारी स्तरावर झालेला सामंजस्य करार झालेले भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये परस्पर सहयोग असून हे देश लिथियम (जागतिक-सर्वोच उत्पादकांपैकी सुमारे 47%) आणि कोबाल्ट (जगातील 3%- चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक) उत्पादनात आघाडीवर आहेत. हा सामंजस्य खाण मंत्रालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग तसेच काबिल आणि सीएमओ यांच्यात झाला आहे.

नवी दिल्ली येथे काबिलचे नोंदणीकृत कार्यालय उघडणे ही मोठी प्रगती आहे असून भारताच्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी करण्यासाठी आवश्यक खनिजांचा सातत्यपूर्ण पुरवठा सुरक्षित करण्यासाठी काबिलची कार्यक्षमता उपयोगी पडेल.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2020326)