संरक्षण मंत्रालय
लष्करी परिचारिका सेवा विभागाने साजरा केला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन, 2024
प्रविष्टि तिथि:
11 MAY 2024 1:11PM by PIB Mumbai
‘आपल्या परिचारिका आपले भविष्य, काळजीची आर्थिक शक्ती’ ही यावर्षीची संकल्पना असल्याचे आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने घोषित केले आहे. या संकल्पनेचे अनावरण मेजर जनरल आय डी फ्लोरा, अतिरिक्त डीजीएमएनएस यांनी केले. यानिमित्ताने ‘ रुग्ण सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर: शाप की वरदान’ या विषयावर चर्चा आणि गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या गटातील जेष्ठ सदस्यांनी परिचारक व्यवसायातील आव्हाने, परिचारिकांना सक्षम बनवण्याचा दृष्टिकोन, परिचारिकांची नेतृत्व भूमिका, परिचारिका शिक्षण, आरोग्य सेवेतील डिजिटलायझेशन, परिचारिकांचे तणाव’ इत्यादींसह विविध पैलूंवर चर्चा केली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत परिचारक अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कॅप्टन दीपा शजन यांना पुष्पनरंजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले आणि त्यांनी सैनिकी सर्व परिचारक अधिकाऱ्यांनी विहित व्यावसायिक मानकांचे आणि नैतिकतेचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित केले. अत्यंत सहानुभूतीने आणि मनापासून काळजी घेणाऱ्या आणि निरंतर वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये अथकपणे काम करणाऱ्या परिचारक अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
9JG5.jpeg)
P0Z8.jpeg)
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 2020322)
आगंतुक पटल : 158