संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त डीआरडीओद्वारे व्याख्याने आणि भाषणांचे आयोजन

Posted On: 10 MAY 2024 6:01PM by PIB Mumbai

 

दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) 10 मे 2024 रोजी, आपल्या प्रयोगशाळा आणि आस्थापनांमध्ये विविध विषयांवरील व्याख्याने आणि भाषणे आयोजित केली होती.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी संरक्षण विज्ञान मंचाने (डीएसएफ) नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. शास्त्रज्ञांनी देशाला अधिक  बळकट आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान देऊन राष्ट्रसेवेसाठी स्वतःला पुन्हा एकदा समर्पित करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.  संरक्षण विज्ञान मंचाचे संयोजक आणि महासंचालक (जीवन विज्ञान) डॉ यूके सिंह यांनी आपल्या स्वागतपर भाषणात, संशोधन आणि विकासामधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि नवोन्मेशी नेतृत्व शैलीची गरज अधोरेखित केली.  वंदे भारत एक्स्प्रेसचे मास्टर माइंड’, सुधांशू मणी यांनी कार्यक्रमात बीजभाषण दिले.

भारताच्या यशस्वी अणुचाचणीचे स्मरण करण्यासाठी आणि देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वाची  भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या अमोल योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने राष्ट्र उभारणीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2020285) Visitor Counter : 46


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil