संरक्षण मंत्रालय
आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि अनुशासन ) कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2024 4:04PM by PIB Mumbai
इंटर-सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन्स (आयएसओ), अर्थात आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि अनुशासन) कायदा 10 मे 2024 पासून लागू करण्याची अधिसूचना राजपत्र अधिसूचनेद्वारे जारी करण्यात आली आहे. इंटर-सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन्सच्या प्रभावी आदेश, नियंत्रण आणि कार्यक्षम कामकाजाला चालना देण्यासाठी,संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2023 च्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर केले होते. या विधेयकाला15 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली.
हा कायदा इंटर-सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन्सच्या कमांडर-इन-चीफ आणि ऑफिसर-इन-कमांड यांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सेवा कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देतो, जेणेकरून प्रत्येक सेवेच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा शर्तींचे पालन करून शिस्त आणि प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करता येऊ शकेल.
या अधिसूचनेसह हा कायदा इंटर-सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन्सच्या प्रमुखांना अधिक सक्षम करेल आणि प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचा मार्ग खुला करेल, बहुविध कार्यवाही टळेल आणि सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकात्मता आणि सहयोग वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2020246)
आगंतुक पटल : 128