रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे सीआयआयच्या सहकार्याने होणाऱ्या मेडीटेक स्टॅकॅथॉन 2024 चे औषधी विभागांच्या सचिवांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 07 MAY 2024 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2024

रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधी विभागाचे सचिव डॉ.अरुनीश चावला यांनी आज नवी दिल्ली येथे सीआयआयच्या सहकार्याने होणाऱ्या मेडीटेक स्टॅकॅथॉन 2024 चे उद्घाटन केले. मेडीटेक स्टॅकॅथॉन हा भारताच्या वाढत्या औषधी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात निवडक वैद्यकीय उपकरणांचे सर्वसमावेशक मूल्य साखळीचे विश्लेषण करून परिवर्तनशील बदल घडवून आणण्यासाठी आरेखन केलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या उद्योगातील नेते, धोरणकर्ते आणि तज्ञ यांच्याशी जवळून सल्लामसलत करून केल्या जाणाऱ्या या स्टॅकॅथॉन चे उद्दिष्ट असे आहे की गंभीर आव्हानांना तोंड देणे, देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि आयात अवलंबित्व कमी करणे, ज्यामुळे भारताला वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये जागतिक पातळीवर आघाडीचे स्थान मिळेल. औषधनिर्माण विभागाचे सहसचिव आर. पी. सिंह आणि सीआयआय राष्ट्रीय औषधी तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष हिमांशू बैद आणि विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि या उद्योगाचे विविध प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मेळाव्याला संबोधित करताना डॉ. अरूनीश चावला म्हणाले की, भारताच्या औषध तंत्रज्ञान उद्योगामध्ये प्रचंड क्षमता आहे, 2030 पर्यंत वार्षिक 28% वाढीचा दर ग्राह्य धरून वार्षिक उलाढाल 50 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. ते म्हणाले की, आशियातील वैद्यकीय उपकरणांसाठीची भारत ही चौथी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि जागतिक स्तरावर सर्वोत्तम 20 मध्ये याचा समावेश होतो. 2022-23 साठी निव्वळ आयात 0.45 च्या आयात  प्रमाणासह 4101 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे.

सचिव म्हणाले की या क्षेत्राने आपल्या आयातीत वाढ केली आहे, जी प्रामुख्याने अमेरिका, चीन आणि जर्मनी सारख्या देशांनी चालविली आहे. तथापि, भारताची मजबूत धोरण परिसंस्था निर्यात वाढीसाठी आणि देशांतर्गत उत्पादनाद्वारे आयात अवलंबित्व कमी करण्याच्या संधी सादर करते.

स्टॅकॅथॉन द्वारे,सहभागी वैद्यकीय उपकरण उद्योगातील विविध उत्पादन विभागांच्या जटिलतेचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्याशी संबंधित आव्हाने आणि संधींचे मूल्यमापन करण्यात येईल, वैद्यकीय उपकरण उद्योगाच्या विविध विभागांमधील मूल्य साखळींचे विश्लेषण आणि नकाशा तयार करतील आणि मुख्य भागधारक, प्रक्रिया आणि अवलंबित्व, वैद्यकीय उपकरण उद्योगाच्या विकासात अडथळा आणणाऱ्या गंभीर समस्यांचे निराकरण केले जाईल. उदाहरणार्थ आयात अवलंबित्व, नियामक अडथळे आणि तांत्रिक अंतर ओळखणे याचा आढावा डॉ.चावला यांनी आपल्या भाषणात घेतला.

स्टॅकॅथॉन कॅन्सर थेरपी, इमेजिंग, क्रिटिकल केअर, सहाय्यक वैद्यकीय उपकरणे, बॉडी इम्प्लांट्स, सर्जिकल उपकरणे आणि रुग्णालय उपकरणे, उपभोग्य आणि टाकाऊ साहित्य आणि आयव्हीडी उपकरणे आणि अभिकर्मक अशा आठ केंद्रित गटांमध्ये यांची विभागणी केली जाईल. महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांचे आयात-निर्यात गतीशीलतेचे मूल्यांकन, कार्य संरचनांची तपासणी आणि संपूर्ण मूल्य साखळीमध्ये त्यांचे परिणाम प्रत्येक विशिष्ट उद्दिष्टांसह आणि विभागणीसह कार्य करणारे असेल, याची दक्षता घेतली जाईल.

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 




(Release ID: 2019895) Visitor Counter : 90