खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी-आयएसएम, धनबाद संस्थेच्या सहयोगासह केंद्रीय खाण मंत्रालय राज्य खनन निर्देशांकावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करणार

प्रविष्टि तिथि: 07 MAY 2024 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2024

धनबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था-भारतीय खनन विद्यालय (आयआयटी-आयएसएम) या संस्थेच्या सहयोगासह केंद्रीय खाण मंत्रालय उद्या, 08 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करणार आहे. राज्यांच्या खाण क्षेत्राची कामगिरी जाणून घेण्यासाठी परिकल्पित केलेल्या राज्य खनन निर्देशांकाच्या मसुदा आराखड्यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही.एल.कांता राव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेत विविध राज्यांतील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

खनन क्षेत्र असंख्य मूल्यसाखळ्यांच्या बाबतीत आघाडीवरील क्षेत्र असून या क्षेत्राकडून पोलाद, बिगर-लोह प्रकारचे धातू, सिमेंट, खते, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करण्यात येतो. देशातील खनन क्षेत्राच्या विकासासाठी राज्यांची भूमिका निर्णायक असते. देशातील खनन क्षेत्रासाठी, निःपक्षपाती वृत्ती, शाश्वतता तसेच जबाबदारीसह साधनसंपत्तीच्या वापराच्या कार्यक्षमतेला प्राधान्य देणारी दूरदृष्टी आणि भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या अन्वेषणावर अत्यंत एकाग्र केलेले लक्ष; भविष्यातील खनिज उत्पादन सुलभ करणाऱ्या कृती हाती घेणे आणि खननसंबंधी कार्यांमुळे प्रभावित झालेले लोक तसेच प्रदेश यांचे हित आणि लाभांसाठी काम करणे आवश्यक असते. अशा पद्धतीच्या राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये, राज्यांचे सापेक्ष योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते दिसून येणे आवश्यक आहे.तशाच प्रकारे, खाण क्षेत्राची कामगिरी आणि खनन कार्यांच्या संदर्भात राज्यांची भविष्यासाठीची तयारी जाणून घेण्याच्या उद्देशाने राज्य खनन निर्देशांकाची कल्पना मांडण्यात आली आहे. या निर्देशांकाची कक्षा बिगर-इंधन प्रकारची महत्वाची खनिजे आणि किरकोळ खनिजे यांच्यापर्यंत सीमित आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाने आयआयटी-आयएसएम, धनबाद या संस्थेला या निर्देशांकाचा आराखडा तयार करणे, संबंधित माहिती संकलित करणे आणि निर्देशांकाचे सूत्र निश्चित करणे यासंदर्भात अभ्यास करण्याचे कार्य सोपवले आहे.

ही प्रक्रिया पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ बनवण्यासाठी, निर्देशांक विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर राज्यांचा सल्ला घेण्यात येत आहे. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा हा याच प्रयत्नांचा भाग आहे. कार्यशाळेत राज्यांकडून मिळालेले अभिप्राय निर्देशांकाच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी उपयुक्त ठरतील.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2019882) आगंतुक पटल : 114
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu