पंचायती राज मंत्रालय

उद्या 3 मे 2024 रोजी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात लोकसंख्या आणि विकास आयोगाच्या 57 व्या अधिवेशनाला जोडून होत असलेल्या "स्वयं सहाय्यता गटांचे स्थानिकीकरण: भारतातील स्थानिक प्रशासनातील महिला नेतृत्वाचा प्रशस्त मार्ग"या विषयावरील परिषदेत पंचायती राज संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी सहभागी होणार

Posted On: 02 MAY 2024 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2024

 

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी मिशन आणि केंद्रीय पंचायती राज मंत्रालय, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी [United Nations Population Fund (UNFPA)] यांच्या सहकार्याने 3 मे 2024 रोजी अमेरिकेत न्यूयॉर्क इथे "स्वयं सहाय्यता गटांचे स्थानिकीकरण: भारतातील स्थानिक प्रशासनातील महिला नेतृत्वाचा प्रशस्त मार्ग"  या विषयावरील परिषदेचे आयोजन करणार आहे. येत्या 29 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात लोकसंख्या आणि विकास आयोगाचे 57 वे अधिवेशन [Commission on Population and Development (CPD57] होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित केली जाणार आहे. त्रिपुरामधील सेपाहीजला जिल्हा परिषदेच्या  सभाधिपती सुप्रिया दास दत्ता, आंध्र प्रदेशातील पेकेरू ग्रामपंचायतीच्या सरपंच कुनुकू हेमा कुमारी आणि राजस्थानच्या लांबी अहीर ग्रामपंचायतीच्या सरपंच नीरू यादव या तीन मान्यवर या परिषदेत सहभागी होणार असून, त्या भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व करतील. या परिषदेत भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज करणार आहेत.

A group of women standing in front of a wood wallDescription automatically generated

अधिवेशनाला जोडूनच 3 मे 2024 रोजी होत असलेल्या "स्वयं सहाय्यता गटांचे स्थानिकीकरण: भारतातील स्थानिक प्रशासनातील महिला नेतृत्वाचा प्रशस्त मार्ग" (Localizing the SDGs: Women in Local Governance in India Lead the Way) या परिषदेत तळागाळातील राजकीय नेतृत्वातील भारतीय महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला जाईल. तसेच तळागाळातील शाश्वत विकासातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावरही या परिषदेत भर दिला जाणार आहे. या महत्त्वाच्या परिषदेचे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून शुक्रवारी 3 मे 2024 रोजी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:45 वाजता भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या समाजमाध्यमांवरील पानांवर  थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या थेट प्रक्षेपणामुळे जगभरातील प्रेक्षकांना महिला सक्षमीकरणाचे हे प्रेरक स्वरुप / अभिव्यक्ती पाहण्याची संधी मिळणार आहे.(https://webtv.un.org/en/asset/k1e/k1e5k5ukq7)

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019477) Visitor Counter : 63