संसदीय कामकाज मंत्रालय

संसदीय कामकाज मंत्रालयाकडून स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन

Posted On: 01 MAY 2024 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मे 2024

 

संसदीय कामकाज मंत्रालयाने 16 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा(पखवाडा) साजरा केला. भारत सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2024 सालच्या स्वच्छता पंधरवड्याच्या कालावधीनुसार याचे आयोजन करण्यात आले होते.

16 एप्रिल 2024 रोजी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सचिवांनी ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ देऊन स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात केली.

स्वच्छता पंधरवडा दरम्यान, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि मंत्रालयाच्या विविध विभागांद्वारे जुन्या दस्तावेज फायलींचे पुनरावलोकन, नोंदणी आणि विलगीकरण करण्यात आले आणि जुन्या आणि अप्रचलित वस्तू लिलावासाठी निवडण्यात आल्या. संविधान सदनमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या कार्यालयांमध्येही खोल्या आणि उपकरणांची स्वच्छता आणि नियमित देखभाल करण्यात आली. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, जनजागृती आणि स्वच्छतेची संस्कृती विकसित करण्यासाठी विकासपुरी येथील केरळ उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्वच्छता प्रतिज्ञा देण्यात आली. शाळेत निबंध स्पर्धाही घेण्यात आली व विजेत्यांना प्रमाणपत्रासह रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्वच्छता पंधरवडा, 2024 चा समारोप स्वच्छता मापदंडात सर्वोत्तम स्थान प्राप्त केलेल्या मंत्रालयाच्या तीन प्रमुख विभागांना पारितोषिक वितरणाने झाला. यावेळी बोलताना संसदीय कामकाज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. सत्य प्रकाश यांनी अंतर्बाह्य स्वच्छतेची गरज अधोरेखित केली. डॉ प्रकाश यांनी पखवाड्यादरम्यान मंत्रालयातर्फे राबविलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहितीही दिली. जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वच्छतेच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.

Image

संसदीय कामकाज मंत्रालयाचे सचिव उमंग नरुला यांनी स्वच्छता संबंधित उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. स्वच्छता हा मोठ्या उद्दिष्टाचा एक भाग असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांना स्वच्छता पंधरवड्याचे परिणाम वर्षभर टिकविण्याचे आवाहन केले.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019367) Visitor Counter : 97