संरक्षण मंत्रालय
माणेकशॉ केंद्रात ‘युध्द कौशल्यांच्या गतिशील उत्क्रांतीमध्ये ‘व्हिजन 2100' आणि जनरल सुंदरजी यांचा वारसा’ यावर चौथ्या जनरल के.सुंदरजी स्मृती व्याख्यानाचे आयोजन
Posted On:
30 APR 2024 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2024
भारतातील आघाडीचे लष्करी विचारवंत जनरल के. सुंदरजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय लष्करातर्फे माणेकशॉ केंद्रात चौथ्या जनरल सुंदरजी स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. लष्कराच्या मेकेनाइज्ड इन्फन्ट्री सेंटर एंड स्कूल (एमआयसी आणि एस) आणि सेंटर फॉर लॅण्ड वॉरफेअर स्टडीज (सीएलएडब्ल्यूएस) यांच्या पुढाकाराने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
तिन्ही सेनादलांतील विद्यमान अधिकारी तसेच निवृत्त अधिकारी यांच्यासह अनेक विद्वज्जन तसेच विविध विचारवंत या व्याख्यानाला उपस्थित होते. ज्यांना प्रेमाने ‘यांत्रिकीकृत पायदळ रेजिमेंटचे जन्मदाते’ असे संबोधले जाते ते देशाचे 13 वे लष्करप्रमुख आणि अष्टपैलू तसेच द्रष्टे असलेले जनरल के.सुंदरजी यांचे या व्याख्यानाच्या माध्यमातून स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आपल्या बीजभाषणामधून जनरल सुंदरजी यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित केले. युध्दक्षेत्राचे डिजिटलीकरण, माहिती आधारित युध्दकौशल्य, तंत्रज्ञानाचा समावेश, पारंपरिक युद्धनीती आणि सेनादलांची रचना या क्षेत्रांच्या बाबतीत जनरल सुंदरजी यांच्याकडे असलेली दूरदृष्टी अधिक ठळकपणे सर्वांसमोर मांडत, लष्करप्रमुख पांडे म्हणाले की त्यांचे हे कार्य ‘व्हिजन 2100’ मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019222)
Visitor Counter : 63