वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) 5.2 टक्क्यांची वाढ
सिमेंट, कोळसा, वीज, नैसर्गिक वायू, पोलाद आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात सकारात्मक वाढीची नोंद
Posted On:
30 APR 2024 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2024
देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) मार्च2023 मधील निर्देशांकाच्या तुलनेत, मार्च 2024 मध्ये, 5.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिमेंट, कोळसा, वीज, नैसर्गिक वायू, पोलाद, आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात मार्च 2024 मध्ये सकारात्मक वाढीची नोंद झाली आहे. या क्षेत्रांतील वार्षिक आणि मासिक वाढीच्या निर्देशांकाचे आणि वृद्धीदराचे तपशील अनुक्रमे परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मध्ये दिले आहेत.
आयसीआय हा देशातील सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीज, खते, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि पोलाद अशा महत्त्वाच्या आठ उद्योगांमधील उत्पादनाच्या एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचे मोजमाप करणारा निर्देशांक आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण बाबींमध्ये, या आठ प्रमुख उद्योगांचा वाटा 40.27 टक्के इतका आहे.
देशातील आठ प्रमुख उद्योगांचा डिसेंबर 2023 साठीचा सुधारित अंतिम वृद्धी दर 5.0 टक्के आहे. वर्ष 2023-24 दरम्यान आयसीआयचा एकत्रित विकास दर मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 7.5 टक्के (तात्पुरता) इतका नोंदवण्यात आला आहे.
देशातील महत्त्वाच्या आठ उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खाली दिला आहे:
सिमेंट - सिमेंट उत्पादन (भार : 5.37 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत, मार्च 2024 मध्ये 10.6 टक्क्यांनी वाढले. सिमेंटचा एकत्रित निर्देशांक वर्ष 2023-24 दरम्यान त्याआधीच्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 9.1 टक्क्यांनी वाढला.
कोळसा - कोळसा उत्पादन (भार : 10.33 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये 8.7 टक्क्यांनी वाढले. कोळशाचा एकत्रित निर्देशांक वर्ष 2023-24 दरम्यान त्याआधीच्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 11.7 टक्क्यानी वाढला.
कच्चे तेल - कच्च्या तेलाचे उत्पादन (भार : 8.98 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये 2.0 टक्क्यांनी वाढले. कच्च्या तेलाचा एकत्रित निर्देशांक 2023-24 दरम्यान त्याआधीच्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 0.6 टक्क्यानी वाढला.
वीज - वीज निर्मिती (भार : 19.85 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 8.0 टक्क्यांनी वाढली. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.0 टक्क्यांनी वाढ झाली.
खते - खते उत्पादन (भार : 2.63 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये 1.3 टक्क्यांनी घटले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी वाढ झाली.
नैसर्गिक वायू - नैसर्गिक वायूचे उत्पादन (भार : 6.88 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 6.3 टक्क्यांनी वाढले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी वाढ झाली.
पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने - पेट्रोलियम रिफायनरी उत्पादन (भार : 28.04 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 0.3 टक्क्यांनी घसरले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली.
पोलाद - पोलाद उत्पादन (भार : 17.92 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 5.5 टक्क्यांनी वाढले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी वाढ झाली.
टीप 1: जानेवारी- 2024, फेब्रुवारी- 2024 आणि मार्च- 2024 साठीची आकडेवारी तात्पुरती आहे. स्त्रोत संस्थांकडून अद्ययावत आकडेवारीनुसार प्रमुख उद्योगांचे निर्देशांक सुधारित किंवा अंतिम केले जातात.
टीप 2: एप्रिल 2014 पासून, नूतनीकरणीय स्त्रोतांकडून वीज निर्मिती डेटा देखील समाविष्ट केला आहे.
टीप 3: वर दर्शवलेला उद्योग-निहाय भार हा औद्योगिक उत्पादन निर्देशांकातून घेतलेला वैयक्तिक उद्योग भार आहे आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा एकत्रित भार 100 इतका आहे.
टीप 4: मार्च 2019 पासून, तयार पोलाद उत्पादनात ‘कोल्ड रोल्ड (CR) कॉइल्स’ वस्तू अंतर्गत हॉट रोल्ड पिकल्ड अँड ऑइल्ड (HRPO) नावाचे नवीन पोलाद उत्पादन देखील समाविष्ट केले गेले आहे.
टीप 5: एप्रिल, 2024 साठी निर्देशांक शुक्रवार 31 मे, 2024 रोजी प्रसिद्ध होईल.
Annex I, Annex II,
* * *
S.Kakade/Sanjana/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019219)
Visitor Counter : 80