कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि बांगलादेशचे सार्वजनिक प्रशासन मंत्रालय यांच्यामधील सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाचे शिष्टमंडळ बांगलादेश भेटीवर
Posted On:
28 APR 2024 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2024
राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि बांगलादेश चे सार्वजनिक प्रशासन मंत्रालय यांच्यामधील सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाचे शिष्टमंडळ बांगलादेश भेटीवर जात आहे.
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण (डीएआरपीजी) विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास बांग्लादेशला 28 ते 30 एप्रिल दरम्यान भेट देणाऱ्या चार सदस्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या भेटीदरम्यान भारताचे राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि बांगलादेश चे सार्वजनिक प्रशासन मंत्रालय यांच्यामधील सामंजस्य कराराचे 2024 ते 2029 या कालावधीसाठी नूतनीकरण करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.बांगलादेशच्या सार्वजनिक प्रशासन मंत्रालयाच्या निमंत्रणावरून ही भेट आयोजित करण्यात आली आहे आणि या भेटीदरम्यान बांगलादेशच्या सनदी सेवकांसाठी कारकीर्दीदरम्यान क्षमता उभारणी कार्यक्रमांवर भर देण्यात येईल.
2014 सालापासून भारताचे राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि बांगलादेश चे सार्वजनिक प्रशासन मंत्रालय यांनी बांगलादेशच्या सनदी सेवकांसाठी क्षमता उभारणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परस्पर सहकार्य निर्माण केले आहे. द्विपक्षीय सहकार्यांतर्गत 71 क्षमता उभारणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि 2014 पासून बांगलादेशच्या 2600 सनदी सेवकांनी भारताच्या राष्ट्रीय सुशासन केंद्राला भेट दिली आहे. बांगलादेश सरकारने या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उपयुक्ततेचे महत्त्व लक्षात घेतले आहे आणि असे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या भारताचे राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि बांगलादेश चे सार्वजनिक प्रशासन मंत्रालय यांच्यातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात स्वारस्य असल्याचे कळवले आहे. हा करार 2025 मध्ये समाप्त होणार आहे.
या तीन दिवसांच्या भेटी दरम्यान प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण (DARPG) विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास सार्वजनिक प्रशासन मंत्री, नागरी सेवा प्रशासन अकादमी आणि प्रशिक्षण केंद्र तसेच पंतप्रधान कार्यालयातील शासन नवोन्मेष केंद्राचे महासंचालक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. व्ही. श्रीनिवास बांगलादेश नागरी सेवा प्रशासन अकादमीचे शिक्षक आणि विधि आणि प्रशासन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019042)
Visitor Counter : 108