संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाने डिजीलॉकर एकात्मीकरणासह डिजिटल परिवर्तनाचा केला प्रारंभ
Posted On:
26 APR 2024 8:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2024
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक प्रमुख उपक्रम असलेल्या डिजीलॉकर मंचाशी जोडले जाऊन भारतीय हवाई दलाने परिवर्तनाचे पाऊल उचलत 26 एप्रिल 2024 रोजी डिजिटल प्रवासाला प्रारंभ केला.डिजीलॉकरच्या सुरक्षित आणि सुलभ दस्तऐवज भांडार सेवेचा लाभ घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत हवाई दल मुख्यालय, वायू भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात, सामंजस्य करार केला.
या एकात्मीकरणामुळे भारतीय हवाई दलाच्या सेवारत आणि निवृत्त दोन्ही कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज डिजिटल पद्धतीने जारी करणे, ऍक्सेस आणि पडताळणी करण्याच्या पद्धतीत क्रांती घडेल. भारतीय हवाई दल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून, डेटा सुरक्षितता, कार्यान्वयन कार्यक्षमता आणि माहितीसाठी विनाअडथळा प्रवेश यासाठीच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.
ठळक बाबी :
- भारतीय हवाई दलाचे अधिकृत विभाग आणि तुकड्या आता सुरक्षित जतन आणि सुलभ प्रवेश सुनिश्चित करून राष्ट्रीय डिजीलॉकर भांडारात डिजिटल रेकॉर्ड, प्रमाणपत्रे आणि महत्त्वपूर्ण दस्तऐवज विनाअडथळा अपलोड करू शकतील.
- सेवा प्रमाणपत्र (सीओएस ) आणि सेवा पुस्तिका अधिकारी (एसबीओ) यासारख्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा थेट ऍक्सेस भारतीय हवाई दलातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक डिजीलॉकर वॉलेटच्या माध्यमातून असेल. यामुळे सोयीस्कर पुनर्प्राप्ती आणि पडताळणी शक्य होईल. डिजीलॉकरसोबतच्या एकात्मीकरणामुळे भारतीय हवाई दलातील अग्निवीर वायु भरतीसह विविध प्रक्रिया सुटसुटीत होतील. यामुळे उमेदवाराची शैक्षणिक दस्तऐवज पडताळणी डिजिटल पद्धतीने शक्य होऊन पारदर्शकता आणि विश्वासार्हता वृद्धिंगत होईल.
N.Chitale/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2018977)
Visitor Counter : 94