अवजड उद्योग मंत्रालय

अवजड उद्योग मंत्रालयाला उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पी. एल. आय.) एडवांस्ड केमिस्ट्री सेल (ए. सी. सी.) योजनेंतर्गत 10 गिगावॅट तास (GWh) क्षमतेच्या गीगा-स्केल एडवांस्ड केमिस्ट्री सेल उत्पादन सुविधा उभारण्यासाठी बोलीदारांच्या निवडीसाठी जागतिक स्तरावर मागवलेल्या निविदा प्रक्रियेत सात निविदा प्राप्त झाल्या

Posted On: 23 APR 2024 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2024

 

एडवांस्ड केमिस्ट्री सेल निर्मितीसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन  योजनेअंतर्गत अवजड उद्योग मंत्रालयाला 24 जानेवारी 2024 रोजी जाहीर झालेल्या 10 गिगावॅट तास (GWh) क्षमतेच्या गीगा-स्केल एडवांस्ड केमिस्ट्री सेल उत्पादन सुविधा उभारण्यासाठी जागतिक स्तरावर काढलेल्या पुनर्निविदेअंतर्गत सात बोलीदारांकडून बोली प्राप्त झाली आहे.   12 फेब्रुवारी 2024 रोजी लिलाव पूर्व (प्री-बिड) बैठक आयोजित करण्यात आली होती.  केंद्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टलवर अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 होती आणि 23 एप्रिल 2024 रोजी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या.

या निविदेला प्रतिसाद म्हणून 70 GWh च्या एकत्रित क्षमतेसाठी बोली सादर केलेल्या बोलीदारांची यादी  अशी आहे :  ACME क्लीनटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अमारा राजा ॲडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, अन्वी पॉवर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लिमिटेड, रिलायन्स टीव्हीएस इंडस्ट्रीज लिमिटेड,आणि वारी एनर्जीज लिमिटेड.

मे 2021 मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने 18,100 कोटी रुपये खर्चाच्या उत्पादनाधारित प्रोत्साहन योजना असणाऱ्या तंत्रज्ञान स्नेही ‘‘एडवांस्ड केमिस्ट्री सेल बॅटरी साठवणूक कार्यक्रमाला’ मंजुरी दिली होती.

त्यानंतर, भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने  24 जानेवारी 2024 रोजी उत्पादनाधारित प्रोत्साहन योजनेच्या '‘एडवांस्ड केमिस्ट्री सेल बॅटरी साठवणूक कार्यक्रमा' अंतर्गत ‘एडवांस्ड केमिस्ट्री सेल निर्मिती युनिट्सच्या स्थापनेसाठी 10 गिगा वॅट तास (GWh) च्या एकूण उत्पादन क्षमतेसह कमाल  3,620 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी बोलीदारांची अंतिम निवड यादी तयार करून त्यातून निवड करण्यासाठी प्रस्तावाची विनंती (RfP) जारी केली होती.

 

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018603) Visitor Counter : 59