नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्थेने (IREDA) मिळवला उच्चांकी वार्षिक निव्वळ नफा, थकित कर्जे 1% पेक्षा कमी, बँकिंग - बँकेतर वित्तीय संस्था क्षेत्रात सर्वात वेगवान परिणामांचा प्रस्थापित केला आदर्श

Posted On: 20 APR 2024 3:24PM by PIB Mumbai

 

भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्था (IREDA) या देशातील सर्वात मोठ्या अस्सल - हरित बिगर बँकिंग संस्थेने 2022-23 या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा कर वजावटीनंतर 1252.23 कोटी इतक्या उच्चांकी वार्षिक नफ्याची नोंद केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 44.83% इतक्या उल्लेखनीय वाढीची नोंद झाली आहे. या कंपनीने आपल्या थकित कर्जांचे प्रमाण 2022-23 मधील 1.66% वरून 2023-24 मध्ये 0.99% पर्यंत कमी करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे थकित कर्जाच्या प्रमाणात 40.52% इतकी उल्लेखनीय कपात झाली आहे.

इरेडाच्या मंजूर कर्जाच्या प्रमाणात 26.81% वाढ झाली आहे. 31 मार्च 2023 रोजी मंजूर कर्जाची रक्कम 47,052.52 कोटी रुपये इतकी होती. ती आता 31 मार्च 2024 रोजी 59,698.11 कोटी रुपये झाली. कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात वार्षिक 37,353.68 कोटी रुपयांच्या उच्चांकी कर्जमंजुरीची नोंद केली आणि त्यापैकी 25,089.04 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या 32,586.60 कोटी रुपयांची कर्जमंजुरी आणि 21,639.21 कोटी रुपये कर्जवाटपाच्या तुलनेत अनुक्रमे 14.63% आणि 15.94% इतकी आहे. यामुळे कंपनीच्या इतिहासात सर्वोच्च वार्षिक कर्ज वितरण आणि मंजुरीची नोंद झाली आहे.

कंपनीची निव्वळ संपत्ती 31 मार्च 2023 रोजीच्या 5,935.17 कोटी रुपयांवरून 31 मार्च 2024 रोजी 8,559.43 कोटी रुपये झाल्याने कंपनीच्या निव्वळ संपत्तीत 44.22% वाढ झाली आहे. 

19 एप्रिल 2024 रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात झालेल्या बैठकीत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता लेखापरीक्षण झालेल्या अभूतपूर्व वित्तीय परिणामांची घोषणा करताना कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीच्या असामान्य कामगिरीची आणि शाश्वत वृद्धीची प्रशंसा केली.            

2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 मधील वार्षिक आर्थिक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः

  • करआकारणी पूर्व नफा: रु. 1,139.25 कोटींच्या तुलनेत रु. 1,685.24 कोटी (47.93% वाढ)
  • करआकारणी पश्चात नफा:  रु. 864.63 कोटींच्या तुलनेत रु. 1,252.23 कोटी (44.83% वाढ)
  • मंजूर कर्ज: रु. 32,586.60 कोटींच्या तुलनेत रु. 37,353.68 कोटी (14.63% वाढ)
  • कर्ज वितरण: रु. 21,639.21 कोटींच्या तुलनेत रु. 25,089.04 कोटी (15.94% वाढ)
  • कर्जखाते पुस्तिका: रु. 47,052.52 कोटींच्या तुलनेत रु. 59,698.11 कोटी (26.81% वाढ)
  • निव्वळ संपत्ती: रु. 5,935.17 कोटींच्या तुलनेत रु.8,559.43 कोटी (44.22% वाढ)
  • निव्वळ थकित कर्जे: 1.66% तुलनेत 0.99% (टक्केवारीनुसार 40.52% घट)

2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 मधील चौथ्या तिमाहीमधील प्रमुख आर्थिक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः

  • करआकारणी पूर्व नफा: रु. 288.38 कोटींच्या तुलनेत रु. 479.67 कोटी (66.33% वाढ)
  • करआकारणी पश्चात नफा: रु. 253.62 कोटींच्या तुलनेत रु. 337.38 कोटी             (33.03% वाढ)
  • मंजूर कर्ज: रु. 11,796.95 कोटींच्या तुलनेत रु. 23,407.57 कोटी (98.42% वाढ)
  • कर्ज वितरण: रु. 11,291.09 कोटींच्या तुलनेत रु. 12,869.35 कोटी (13.98% वाढ)
  • कर्जखाते पुस्तिका: रु. 47,052.52 कोटींच्या तुलनेत रु. 59,698.11 कोटी (26.81% वाढ)
  • निव्वळ संपत्ती: रु. 5,935.17 कोटींच्या तुलनेत रु.8,559.43 कोटी (44.22% वाढ)
  • निव्वळ थकित कर्जे: 1.66% तुलनेत 0.99% (टक्केवारीनुसार 40.52% घट)

या उल्लेखनीय आर्थिक परिणामांबद्दल आनंद व्यक्त करत इरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी भारतात गुंतवणूकदार आणि हितधारकांना आश्वासक ग्वाही देत, अपारंपरिक ऊर्जा उपाययोजनांचा अंगिकार वेगाने करण्याच्या इरेडाच्या दृढ वचनबद्धतेवर भर दिला. हितधारकांचा अढळ विश्वास आणि भक्कम पाठबळ यामुळे कंपनीची ही वृद्धी झाली असल्याचे दास यांनी सांगितले. नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि संचालक मंडळाने दिलेले भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाबद्दल मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी आभार मानले.  यावेळी त्यांनी टीम इरेडाची देखील अशा प्रकारच्या असामान्य कामगिरीमध्ये लक्षणीय योगदान देणारी बांधिलकी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल प्रशंसा केली.

केवळ 19 दिवसांमध्ये वित्तीय परिणामांचे वार्षिक लेखापरीक्षण प्रकाशित करून सेबीच्या 60 दिवसांच्या मुदतीला मागे टाकत बँकिंग आणि बँकेतर क्षेत्रात सर्वात जलद प्रकाशनाच्या कामगिरीची नोंद करत इरेडाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षी केवळ 25 दिवसात प्रकाशन करण्याच्या विक्रमाला मागे टाकणारी ही कामगिरी आहे.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018335) Visitor Counter : 53