उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी बैसाखी , मेशादी, वैशाखदी, पुथंडू, विशू, नबवर्ष आणि बोहाग बिहूच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
12 APR 2024 7:34PM by PIB Mumbai
बैसाखी , मेशादी, वैशाखदी, पुथंडू, विशू, नबवर्ष आणि बोहाग बिहू या आनंदाच्या प्रसंगी, मी देशातील सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिष्टचिंतन करतो.
देशभरात अनोख्या नावांनी आणि परंपरेने साजरे होणारे हे सण आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सुंदर चित्र रेखाटतात. आशावादाच्या नव्या भावनेचे आणि समृद्ध भविष्याच्या अपेक्षेचे ते प्रतीक आहेत. नवीन प्रारंभाचा आनंद स्वीकारत असताना, आपण विविधतेतील एकतेच्या भावनेप्रति कटिबद्धता बळकट करूया , जी भारताच्या सभ्यतेची मूल्ये प्रतिबिंबित करते.
हे मंगल प्रसंग सर्वांच्या जीवनात आनंद, यश आणि समाधान घेऊन येवोत.
उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद खालीलप्रमाणे आहे.
बैसाखी, मेशादी, वैशाखड़ी, पुथांडु, विशु, नब वर्ष और बोहाग बिहू के अवसर पर, मैं सभी नागरिकों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं।
देश भर में अनूठे नामों से विभिन्न परंपराओं में मनाए जाने वाले ये त्योहार हमारी समृद्ध सांस्कृतिक विरासत के परिचायक हैं।
आइए, समृद्ध भविष्य की आशा से परिपूर्ण इन त्योहारों पर हम समावेशिता के मूल्यों के प्रति अपनी प्रतिबद्धता को मजबूत करें।
यह शुभ अवसर सभी के जीवन में खुशियाँ, सफलता और पूर्णता लाएँ।
***
S.Kane/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2017810)
Visitor Counter : 103