संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऍडमिरल आर. हरी कुमार यांची सदर्न नेव्हल कमांडला सेवानिवृत्तीपूर्व भेट

Posted On: 07 APR 2024 5:07PM by PIB Mumbai

 

नौदलप्रमुख आर. हरी कुमार यांनी नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन (NWWA)च्या अध्यक्ष कला हरीकुमार यांच्यासोबत कोची येथे सदर्न नेव्हल कमांडला (एसएनसी) 3 ते 6 एप्रिल 2024 दरम्यान सेवानिवृत्तीपूर्वी निरोपाची भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सदर्न नेव्हल कमांडचे अधिकारी आणि खलाशी यांच्यासोबत कोची येथील नौदलाच्या तळावरील सागरिका सभागृहात संवाद साधला. या कार्यक्रमाला आऊटस्टेशन युनिट्सह एसएनसीचे कर्मचारी उपस्थित होते.

या ठिकाणी कार्यालय, परिषद सभागृह, वर्गखोल्या, योग/निरामय कक्ष यांसारख्या एकाच छत्राखाली सर्व सुविधा असलेल्या  एका नव्या एनडब्लूडब्लूए केंद्राचे उद्घाटन, कला हरीकुमार यांच्या हस्ते 5 एप्रिल 2024 रोजी  करण्यात आले. त्यानंतर नौदलप्रमुखांनी संपर्क 3.0 नावाच्या एका ईसीएचएस संपर्क अभियानाला झेंडा दाखवून रवाना केले. या चमूमध्ये एनएचक्यू आणि एसएनसीच्या अधिकारी आणि खलाशांचा समावेश असून ते 8 दिवसांच्या प्रवासात केरळमधील विविध पॉलिक्लिनिक्सना भेट देणार आहेत आणि दुर्गम स्थानांवरील माजी सैनिक आणि वीर नारींसोबत संवाद साधणार आहेत.  

त्याबरोबरच ऍडमिरल हरी कुमार  यांनी आयएनएस द्रोणाचार्य या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या प्रशिक्षण संस्थेला भेट दिली आणि तिथले कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत संवाद साधला.  द्रोण गान मध्येही ते सहभागी झाले. 1997 ते 1999 या काळात प्रशिक्षणार्थी कमांडर म्हणून जिथे काम केले, त्या प्रशिक्षण कक्षालाही त्यांनी भेट दिली.

यावेळी नौदलप्रमुखांना निरोप देण्यासाठी आयएनएस गरुडावर पारंपरिक बडा खाना या मेजवानीचे आयोजन करण्यात आले. दक्षिणी नौसेना कमान परिवाराच्या कर्मचाऱ्यांसोबत नौदलप्रमुखांनी संवाद साधला आणि देशाच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपले कर्तव्य धैर्याने आणि एक संघ म्हणून एकत्रित राहून पार पाडावे, असे आवाहन केले.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2017374) Visitor Counter : 105


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil