संरक्षण मंत्रालय
संरक्षणदलप्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान, तिन्ही सेनादलांच्या संयुक्तपणा आणि एकात्मिकता यावरील पहिल्या ‘परिवर्तन चिंतन’ या परिषदेचे भूषवणार अध्यक्षपद
प्रविष्टि तिथि:
07 APR 2024 2:38PM by PIB Mumbai
देशाच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये संयुक्तपणा आणि एकात्मिकतेचे प्रयत्न निर्माण करण्यासाठी सुधारणेच्या, नव्या आणि ताज्या संकल्पना निर्माण करण्याच्या आणि नव्या उपक्रमांच्या आयोजनाच्या उद्देशाने नवी दिल्लीत 8 एप्रिल 2024 रोजी परिवर्तन चिंतन या पहिल्या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षणदलप्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान या एक दिवसीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील.
भविष्यातील युद्धांसाठी सज्ज राहण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय सशस्त्र दलांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यांच्यात संयुक्तपणा आणि एकात्मिकतेच्या भावनेला प्रोत्साहन देऊन त्यांना त्रि-सेवा बहु आयामी कारवाईसाठी सक्षम बनवण्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
तिन्ही सेवा दलांचे प्रमुख, संरक्षण व्यवहार विभाग, एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय आणि तिन्ही सेवा दलांचे विविध श्रेणीतील अधिकारी, यांची ‘चिंतन’ ही पहिली परिषद असेल, ज्यामध्ये तिन्ही दले, आपल्या विविधतापूर्ण ज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण करतील आणि आपला वेगळेपणा बाजूला सारून आवश्यक असलेली संयुक्त आणि एकात्मिकतेची भावना वाढीला लावण्याच्या उपाययोजना सुचवतील.
***
M.Pange/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2017365)
आगंतुक पटल : 173