संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युद्धाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेण्याची गरज चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केली अधोरेखित


वेलिंग्टन येथे 79 वा कर्मचारी सेवा अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या अधिकाऱ्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 05 APR 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2024

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  युद्धाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेण्याची गरज अधोरेखित केली आणि आंतर-सेवा समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते आज 5 एप्रिल 2024 रोजी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये भारतीय सशस्त्र दलातील भावी अधिकाऱ्यांना संबोधित करत होते.

सीडीएस चौहान यांनी आपल्या भाषणात,नवनव्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यात केल्या जात असलेल्या परिवर्तनात्मक सुधारणांवर लक्ष केंद्रित केले.यावेळी समन्वय  आणि आंतर सेवा जागरूकता वाढवण्यावर भर देण्यात आलेल्या, प्रशिक्षण उपक्रमांबद्दल सीडीएस चौहान यांना कमांडंट यांनी  माहिती दिली.

या महाविद्यालयात सध्या 79वा कर्मचारी  अभ्यासक्रम सुरू आहे. हा अभ्यासक्रम 45 आठवड्यांचा आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात 476 विद्यार्थी अधिकारी आहेत ज्यात 26 मित्र देशांमधील  36 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रथमच आठ महिला अधिकारीही सहभागी झाल्या आहेत.

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2017273) आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil