उपराष्ट्रपती कार्यालय
समानतेच्या मुद्यावर भारताला या पृथ्वीतलावरील कोणाच्याही उपदेशाची गरज नाही -उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
Posted On:
05 APR 2024 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2024
समानतेच्या मुद्यावर या पृथ्वीतलावरील कोणाच्याही उपदेशाची भारताला गरज नाही, कारण आम्ही त्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे,असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केले. “काही देशांमध्ये अद्याप महिला राष्ट्रपती नाहीत , त्याउलट ब्रिटनच्या खूप आधी आपल्याकडे महिला पंतप्रधान होत्या. इतर देशांतील सर्वोच्च न्यायालयांतून 200 वर्षांत महिला न्यायाधीश झाल्या नाहीत पण आपल्याकडे आहेत, असे अधोरेखित करत अनेक देशांनी आपल्या अंतर्मनात डोकावून पहायला हवे असे परखडपणे सांगितले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल खोट्या गोष्टी आणि चुकीच्या माहितीविरोधात सावधगिरी बाळगण्यास सांगताना धनखड म्हणाले की सीएए कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा पूर्वीप्रमाणे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापासून कोणालाही वंचित ठेवत नाही. सीएए शेजारील देशांतील अल्पसंख्याकांसाठी भारतीय नागरिकत्व मिळवणे सुलभ करते,असे नमूद करत, “ शेजारच्या राष्ट्रातील लोकांच्या धार्मिकतेप्रति बांधिलकीमुळे झालेल्या छळामुळे आम्हाला सहानुभूती वाटण्याऐवजी भेदभाव कसा करता येईल?” असा प्रश्न उपराष्ट्रपतींनी उपस्थित केला.
31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्यांना सीएए लागू होते असे नमूद करत देशात येण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलेले नाही यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. “आपल्याला या खोट्या कथा खोडून काढायच्या आहेत. हे अज्ञानातून आलेले नाही तर देशाला संपवण्याची रणनीती आखणाऱ्यांचा हा डाव आहे,”असा इशारा देत त्यांनी सर्वांना सावध केले.
मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी येथे आज 2023 च्या भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपावेळी संबोधित करताना "आपल्या गौरवशाली आणि मजबूत घटनात्मक संस्थांना कलंकित करण्याच्या उद्देशाने,वास्तविकदृष्ट्या असमर्थनीय राष्ट्रविरोधी कथनाचा निषेध करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. लोक तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतात.“तुम्हाला असे काम करून दाखवायचे आहे ज्याचे अनुकरण केले जाईल, प्रेरणादायी असेल आणि युवकांना प्रेरित करेल आणि प्रभावी क्षमता दाखवत ज्येष्ठांकडून शाबासकीची थाप मिळवेल अशा कृतींचे उदाहरण तुम्हाला समोर दाखवून द्यावे लागेल,असे आवाहन उपराष्ट्रपतींनी प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थींना केले.
आपल्या सुसंस्कृत मूल्यांचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून वर्णन करून, उपराष्ट्रपतींनी तरुण अधिकाऱ्यांना "सेवाभाव आणि समानुभूती - सेवा आणि सहानुभूती या भावनेने काम करण्यास सांगितले."
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017265)
Visitor Counter : 114