नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सन 1870 पासून कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात 2023-24 मध्ये सर्वकालीन विक्रमी मालवाहतूक

Posted On: 05 APR 2024 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2024

कोलकाता डॉक सिस्टम (केडीएस) आणि हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स (एचडीसी) सह कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातून (एसएमपी कोलकाता) 2023-24 या आर्थिक वर्षात 66.4 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) मालवाहतूक झाल्याने 154 वर्षांच्या इतिहासात एक मैलाचा दगड गाठला गेला आहे. ही मालवाहतूक, आर्थिक वर्ष 2022-23 मधील 65.66 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या मागील विक्रमापेक्षा 1.11% वाढ दर्शविते.

अध्यक्ष रथेंद्र रामन यांनी या अभूतपूर्व कामगिरीचे श्रेय बंदराद्वारे उत्पादकता, सुरक्षा उपाय, व्यवसाय विकास आणि एकूण क्षमतेचा वापर वाढविण्यासाठी राबविलेल्या अनेक धोरणात्मक उपक्रमांना दिले.

एचडीसीच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकताना, रामन यांनी नमूद केले कीहल्दिया कॉम्प्लेक्सने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 49.54 एमएमटी मालवाहतूक केली जी कॉम्प्लेक्सच्या स्थापनेपासून आजवरची सर्वोच्च मालवाहतूक असून आर्थिक वर्ष 2022-23 मधील 48.608 एमएमटीच्या मागील विक्रमाला मागे टाकत 1.91% ची वाढ दर्शवते. दरम्यान, केडीएस ने आर्थिक वर्ष 2022-23 मधील 17.052 एमएमटी च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 16.856 एमएमटी मालवाहतुकीचे व्यवस्थापन केले.

आर्थिक वर्ष 2023-24 मधील बंदराच्या मजबूत आर्थिक कामगिरीवर भर देत अध्यक्षांनी नमूद केले की, 501.73 कोटी रुपयांचा निव्वळ अधिशेष गाठला गेला असून, गेल्या वर्षीच्या 304.07 कोटी रुपयांच्या निव्वळ अधिशेषाच्या तुलनेत 65% लक्षणीय वाढ नोंदवत, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.

बंदराची क्षमता वाढवण्यासाठी, एसएमपी कोलकाता मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांवर भर देत आहे.

 

 

 

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2017219) Visitor Counter : 99