संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दलाकडून देशभरात आपत्कालीन लँडिंग सुविधा कार्यान्वित केली जाणार

Posted On: 04 APR 2024 5:49PM by PIB Mumbai


 नवी दिल्ली, 4 एप्रिल 2024

सध्या सुरू असलेल्या गगन शक्ती-24 सरावाचा एक भाग म्हणून, भारतीय हवाई दलाच्या विमानाचे नुकतेच काश्मीर खोऱ्यातील उत्तरेकडील क्षेत्रातील आपत्कालीन लँडिंग सुविधा येथून परिचालन करण्यात आले. चिनूक, Mi-17 V5 आणि ALH Mk-III हेलिकॉप्टरचा वापर करून मोठ्या संख्येने सैनिकांना विमानाद्वारे निश्चित स्थळी रात्रीपर्यंत  उतरवण्यात आले.

इतर क्षेत्रांमध्ये आपत्कालीन लँडिंग सुविधा  सक्रिय करण्यासाठी भारतीय हवाई दल राज्य प्रशासनाशी समन्वय साधून अशाच प्रकारच्या कवायतींचा सराव करण्याची योजना आखत आहे. भारतीय हवाई दलाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या तसेच रोटरी विंग प्लॅटफॉर्म द्वारे या इमर्जन्सी लँडिंग सुविधांवर समन्वित लँडिंग आणि परिचालन पार पाडले जाणार असून त्यासाठी संपूर्ण राष्ट्रीय दृष्टिकोनासह  नागरी प्रशासनाच्या मदतीने  योग्य नियोजन आणि समन्वय आवश्यक आहे. आपत्कालीन लँडिंग सुविधेच्या परिचालनामुळे भारतीय हवाई दलाच्या विमानांना अशा प्रतिबंधित लँडिंग भूपृष्ठभागांवर परिचालन करण्याची संधी मिळेल  आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत पुरवण्यासाठी तसेच आपत्ती निवारण कार्यात मानवतावादी सहाय्य करण्यासाठी ते सक्षम बनतील. रात्रीच्या वेळी महामार्गांच्या विस्तारित  भागांवर परिचालन  करण्याची क्षमता आणि अशा पृष्ठभागावरून सैनिकांचे  स्थलांतर करण्याची क्षमता वाढल्यामुळे  भारतीय सशस्त्र दलांची परिचालन  क्षमतेतही मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

 


S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2017187) Visitor Counter : 92