नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
इरडाने रचला नवा विक्रम : आतापर्यंतची उच्चांकी कर्ज मंजुरी आणि त्याचे वितरण साध्य
Posted On:
02 APR 2024 11:09AM by PIB Mumbai
शुद्ध-हरित वित्तपुरवठा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी एनबीएफसी असलेल्या भारतीय नवीकरणीय उर्जा विकास संस्थेने (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, इरडा) 2023-24
या आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक कर्ज मंजुरी आणि वितरण साध्य केले आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात 37,354 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली आहेत तर 25,089 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आले. यामुळे कर्ज खात्यात 26.71% ची लक्षणीय वाढ झाली असून ते आता 59,650 कोटी रुपये झाले आहे.
लेखापरीक्षणाच्या अधीन राहून 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक व्यावसायिक कामगिरी (तात्पुरती) खालीलप्रमाणे आहेः
Business Performance for Quarter / Year Ended 2023-24 (Provisional)
|
(In Rs. Crore)
|
Particulars
|
For the 4th Quarter ended
|
For the Year ended 31st March
|
Growth (%)
|
2023-24
|
2022-23
|
2023-24
|
2022-23
|
For Q4
|
Year ended
|
Loan Sanctioned
|
23,796
|
11,797
|
37,354
|
32,587
|
101.71%
|
14.63%
|
Loan Disbursements
|
12,869
|
11,291
|
25,089
|
21,639
|
13.98%
|
15.94%
|
Loan book Outstanding as on 31st March 2024
|
|
59,650
|
47,076
|
|
26.71%
|
कंपनीच्या कामगिरीवर इरडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणालेः “या आर्थिक वर्षातील इरडाची विक्रमी कर्ज मंजुरी आणि वितरण हे देशातील अक्षय ऊर्जा क्रांतीला चालना देण्यासाठी आमची अथक वचनबद्धता अधोरेखित करते. आमचे भागधारक, व्यावसायिक भागीदार आणि गुंतवणूकदार यांच्या अमूल्य पाठिंब्याशिवाय हे यश शक्य झाले नसते. केन्द्र सरकारच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांमध्ये लक्षणीय योगदान देताना आम्हाला आनंद होत आहे आणि येत्या काही वर्षांत आमचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत".
***
JPS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016951)
Visitor Counter : 98