दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(ट्राय)  ‘राष्ट्रीय प्रसारण धोरण - 2024 तयार करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना ’ बाबत सल्लापत्र केले जारी

Posted On: 02 APR 2024 1:09PM by PIB Mumbai

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) राष्ट्रीय प्रसारण धोरण - 2024 तयार करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना बाबत सल्लापत्र आज  जारी केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 13 जुलै 2023 च्या संदर्भाद्वारे ट्रायला राष्ट्रीय प्रसारण धोरण तयार करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा, 1997 च्या कलम 11 अंतर्गत विचारात घेतलेल्या  महत्वपूर्ण सूचना उपलब्ध करून देण्याची  विनंती केली होती. या अनुषंगाने ट्रायने  21 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय प्रसारण धोरण तयार करण्यासाठी ज्या सूचनांचा  विचार करणे आवश्यक आहे ते स्पष्ट करण्यासाठी एक सल्लामसलत -पूर्व  पत्र जारी केले होते.  ट्रायला  28 सूचना प्राप्त झाल्या होत्या. ट्रायने लेखी अहवाल  आणि बैठकांमधून समोर आलेल्या मुद्द्यांचा आढावा घेतला, विविध माध्यमी आणि उद्योगांचे अहवाल, सार्वजनिक दस्तावेज , आंतरराष्ट्रीय पद्धती आणि या क्षेत्राच्या विद्यमान समस्यांचा मुळापासून शोध घेण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांचा अभ्यास केला.

त्यानुसार, ‘राष्ट्रीय प्रसारण धोरण - 2024 तयार करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना बाबत हे सल्लापत्र हितधारकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आले  आहे आणि ते ट्रायच्या संकेतस्थळावर  (www.trai.gov.in ) उपलब्ध आहे. सल्लापत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर 30 एप्रिल 2024 पर्यंत हितधारकांकडून लेखी सूचना आणि मते मागवण्यात आली आहेत. तसेच हे नमूद करण्यात येत आहे की या सल्लापत्रामध्ये कुठल्याही विरोधात्मक सूचना  मागवण्यात आलेल्या नाहीत, कारण या सल्लापत्राचा उद्देश  प्रसारण धोरणासाठी मुद्दे तयार करणे हा आहे.

प्रसारण क्षेत्र हे एक उदयोन्मुख  क्षेत्र आहे ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये योगदान देण्याची प्रचंड क्षमता आहे. नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या युगात देशातील प्रसारण क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकास आणि वाढीसाठी दूरदृष्टी, ध्येय, उद्दिष्टे आणि रणनीती  निश्चित करणे हा धोरण तयार करण्यासाठी मागवण्यात आलेल्या सूचनांचा  उद्देश आहे.

भारताला जागतिक आशय केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या सल्लापत्रात प्रसारण क्षेत्रात प्रचलित असलेल्या  समस्या अधोरेखित केल्या आहेत. सल्लापत्रात  सार्वत्रिक पोहोचद्वारे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढवणे, संशोधन आणि विकासावर  लक्ष केंद्रित करून नवोन्मेषाला  चालना देणे, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि स्टार्ट-अप प्रोत्साहन सुलभ करण्याबाबत धोरण आणि नियामक पद्धती तसेच अवलंबल्या जाणाऱ्या रणनीतीवर  प्रश्न उपस्थित केले आहेत.  सरकारी  प्रसारण सेवा मजबूत करणे, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्या, पायरसी विरोधात लढा आणि आशय सुरक्षा सुनिश्चित करणे, मजबूत प्रेक्षक प्रभाव  प्रणाली, वायरलेस  प्रसारण आणि सामाजिक-पर्यावरणीय जबाबदाऱ्या यावरही या सल्लापत्रात चर्चा केली आहे.

लेखी सूचना शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, advbcs-2[at]trai[dot]gov[dot]in आणि jtadvisor-bcs[at]trai[dot]gov[dot]in वर पाठवाव्यात. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठी, तेजपाल सिंग, सल्लागार (प्रसारण आणि केबल सेवा), ट्राय यांच्याशी दूरध्वनीवरून +91-11-23664516 संपर्क साधावा.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016923) Visitor Counter : 123