अर्थ मंत्रालय
2023-24 या आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या भारत सरकारच्या खात्यांचा मासिक आढावा
Posted On:
28 MAR 2024 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 28 मार्च 2024
भारत सरकारच्या फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या खात्यांचा एकत्रित मासिक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत:-
भारत सरकारला फेब्रुवारी 2024 पर्यंत 22,45,922 कोटी रुपये (एकूण प्राप्तीच्या संबंधित RE 2023-24 च्या 81.5%) प्राप्त झाले आहेत, ज्यात 18,49,452 कोटी रुपयांचा कर महसूल (निव्वळ केंद्राकडे) 3,60,330 कोटी रुपये करेतर महसूल आणि 36,140 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवली प्राप्ती यांचा समावेश आहे. बिगर कर्ज भांडवली प्राप्तीमध्ये 23,480 कोटी रुपयांची कर्जाची वसुली आणि 12,660 कोटी रुपयांच्या विविध भांडवली प्राप्तींचा समावेश आहे. या कालावधीपर्यंत भारत सरकारकडून 10,33,433 कोटी रुपये राज्य सरकारांना कराच्या वाट्याच्या रुपात हस्तांतरित करण्यात आले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत 2,25,345 कोटी रुपयांनी अधिक आहेत.
भारत सरकारने केलेला एकूण खर्च 37,47,287 कोटी रुपये आहे (संबंधित RE 2023-24 च्या 83.4%), त्यापैकी 29,41,674 कोटी रुपये महसूल खात्यावर आणि 8,05,613 कोटी रुपये भांडवली खात्यावर जमा आहेत. एकूण महसुली खर्चापैकी, 8,80,788 कोटी रुपये हे व्याज देयकांच्या खात्यावर आणि 3,60,997 कोटी रुपये मुख्य अनुदान खात्यावर आहेत.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016577)
Visitor Counter : 315