राष्ट्रपती कार्यालय
जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश
Posted On:
23 MAR 2024 3:42PM by PIB Mumbai
दरवर्षी 24 मार्च रोजी पाळल्या जाणाऱ्या जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे:-
“क्षयरोगाबद्दल (टीबी) जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने २४ मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ साजरा केला जात असल्याचे नमूद करताना मला आनंद होतो आहे.
क्षयरोगाच्या जागतिक परिणामांबद्दल जनसामान्यांना जागरूक करणे, या आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा दिवस आपल्याला, क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान व्हावे, त्यावर उपचार व्हावेत आणि प्रतिबंध व्हावा, याच्या महत्वाचे स्मरण करून देतो.
क्षयरोगाचे भारतातून संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन मी करते.”
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
***
M.Pange/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016206)
Visitor Counter : 117