संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशाखापट्टणम येथील ईस्टर्न नेव्हल कमांडला नौदल प्रमुखांची भेट

Posted On: 23 MAR 2024 10:13AM by PIB Mumbai

नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आणि नेव्हल वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या (एनडब्ल्यूडब्ल्यूए) अध्यक्षा कला हरी कुमार यांनी 21-23 मार्च 2024 या कालावधी दरम्यान विशाखापट्टणम येथील नौदलाच्या पूर्वेकडील मुख्यालयाला (ईस्टर्न नेव्हल कमांड) महत्त्वपूर्ण अशी तीन दिवसांची भेट दिली.

आपल्या या भेटीदरम्यान, ऍडमिरल आर हरी कुमार यांनी विशाखापट्टणम येथील नौदलाच्या पूर्वेकडील मुख्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या उपक्रमांमध्ये सीएनएस अर्थात चीफ ऑफ नेवल स्टाफ यांचा समुद्रातील प्रत्यक्ष भेटीचा समावेश होता, जिथे त्यांनी ईस्टर्न नेवल कमांडच्या (नौदलाचे पूर्व मुख्यालय) जहाजांवरील आणि विमानावरील अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधताना समुद्रातील नौदलाच्या एकंदर कामगिरीचा आढावा घेतला.

याशिवाय, आपल्या निरोपाच्या भेटीचा एक भाग म्हणून नौदल प्रमुखांनी नौदलातील अगदी लहान मोठी आव्हाने / समस्या समजून घेण्यासाठी “कनेक्ट विथ सीएनएस” अर्थात नौदल प्रमुखांशी थेट संवाद या अनोख्या कार्यक्रमामधून समुद्रिका सभागृहात ईस्टर्न नेव्हल कमांडच्या नौदल अधिकारी आणि खलाशी यांच्याशी प्रामाणिक, मुक्त आणि स्पष्ट चर्चा केली. त्याआधी नौदल प्रमुखांनी 21 मार्च 2024 रोजी नौदलाच्या डॉक्यार्ड येथील मेघाद्री सभागृहात संरक्षण दलातील नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान, नौदल प्रमुखांनी 21 मार्च 2024 रोजी विशाखापट्टणम येथील नौशक्ती नगर, येथे संरक्षण दलातील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी (डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (DSC)) उभारण्यात आलेल्या 'वीरम' या 492 लोकांच्या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन केले.

मध्य अरबी समुद्रात 11 सोमाली चाच्यांना पकडल्याबद्दल आणि 17 इराणी आणि 19 पाकिस्तानी नागरिकांचे अपहरण केलेल्या मासेमारी जहाजातून इमान आणि अल नईमी यांची सुटका केल्याबद्दल आयएनएस सुमित्रा या लढाऊ जहाजाला नौदल प्रमुखांनी घटनास्थळीच युनिट प्रशस्तीपत्र देखील प्रदान केले.

या जहाजाने आपली एकात्मिक अग्निशमन ताकद, स्वदेशी बनावटीचे एएलएच हेलिकॉप्टर आणि भारतीय नौदलाच्या विशेष कर्मचारी अधिकाऱ्यांच्या चमूच्या मदतीने हे ऑपरेशन वेगाने हाती घेतले होते.

आपल्या या भेटीचा एक भाग म्हणून, नौदल प्रमुखांनी एनजीआयएफ / आयएनबीए आणि नौदल फाउंडेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे (एजीएम) अध्यक्षपद भूषवले. या दोन्ही बैठकांनी नौदल कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि प्रेरणा वाढवण्याच्या उद्देशाने या फलदायी चर्चा आणि सहयोगी प्रयत्नांसाठी मौल्यवान संधी उपलब्ध करून दिली.

नौदल फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून नौदल प्रमुखांनी 21 मार्च 2024 रोजी विशाखापट्टणम येथे नौदल फाउंडेशनच्या 31व्या एजीएम आणि जीसीएम बैठकांचे अध्यक्षपदही भूषवले. या कार्यक्रमाचे आयोजन नौदल मुख्यालय / डीईएसए यांनी केले होते. या कार्यक्रमात नौदल मुख्यालय (एनएचक्यू), ईस्टर्न नेवल कमांडचे मुख्यालय (एचक्यूइएनसी) आणि संरक्षण दलातील प्रमुख लेखा नियंत्रक (पीसीडीए) कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते, यावेळी उपस्थितानी परस्पर संवादही साधला. यावेळी पीसीडीए (पी) प्रयागराज यांनी इ-पीपीओएस (e-PPOs) आणि स्पर्श (SPARSH) संबंधित समस्या दूर केल्या.

यावेळी पेन्शन सल्लागार मंडळींनी सर्व कर्मचाऱ्यांना सल्ला आणि समर्थन प्रदान केले. या कार्यक्रमादरम्यान, नौदल प्रमुखांनी मेळाव्याला पुन्हा आश्वासन दिले की, संरक्षण दलातील अनुभवी आणि अखंड सेवा देणाऱ्या वेटरन समुदायाच्या सर्व समस्यांचे त्वरित निराकरण केले जाईल. नौदल प्रमुखांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर, 22 मार्च 24 रोजी विशाखापट्टणमच्या स्वर्णज्योती कॉन्फरन्स हॉलमध्ये नौदल फाउंडेशन (NF) चॅप्टर्स आणि वेटरन सेलर्स फोरम (VSF) चार्टर्सचे पदाधिकारी/प्रतिनिधी यांच्यात सीपीएस च्या अध्यक्षपदाखाली 'समन्वय' या औपचारिक चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. 

***

HarshalA/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016179) Visitor Counter : 92