अर्थ मंत्रालय
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयकर विभागाने गोव्यात पणजी येथे नियंत्रण कक्ष केला स्थापन
Posted On:
22 MAR 2024 6:52PM by PIB Mumbai
पणजी , 22 मार्च 2024
लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी गोव्यात पणजी येथे आयकर विभागाने सक्रिय उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयकर विभागाने एक समर्पित नियंत्रण कक्ष स्थापन केला असून निवडणुका होईपर्यंत तो रात्रंदिवस कार्यरत राहील.
व्यक्ती किंवा राजकीय पक्षांकडून रोख रक्कम दिली जाणे, मोफत भेटवस्तूंचे वाटप किंवा कोणत्याही प्रकारची प्रलोभने देणे अशा स्वरूपाच्या कोणत्याही तक्रारींचे निवारण करणे हे या नियंत्रण कक्षाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. अशा घटनांची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन आयकर विभागाने नागरिकांना केले आहे.
नागरिक त्यांच्या तक्रारी आणि माहिती खालील माध्यमांद्वारे सामायिक करू शकतात:
- टोल फ्री क्रमांक: 1800-233-3941
- लँडलाईन क्रमांक: 0832-2438447
- ईमेल: goaelections@incometax.gov.in
माहिती देणाऱ्या व्यक्तींची ओळख आणि तपशील गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन आयकर विभागाने दिले आहे. मुक्त, निष्पक्ष आणि न्याय्य वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी विभागाने खऱ्या आणि अचूक माहितीच्या महत्त्वावर भर दिला आहे.
नियंत्रण कक्षाचे नेतृत्व अतिरिक्त आयकर संचालक (तपास) करत आहेत, त्यांच्या कार्यालयाचा पत्ता असा:
तिसरा मजला, त्रिस्टार बिल्डिंग, ईडीसी कॉम्प्लेक्स, पट्टो, पणजी, गोवा - 403001

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2016119)
Visitor Counter : 113