नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

अर्थव्यवस्थेत हायड्रोजन आणि इंधन सेल्ससाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी च्या 41 व्या सूकाणू समितीच्या बैठकीत उद्योग आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन


“हरित हायड्रोजन देशाच्या ऊर्जा पुरवठा साखळीत आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो आणि पुढील 20 वर्षांत अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम करू शकतो” : विशेष सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

Posted On: 22 MAR 2024 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 22 मार्च 2024

नवी दिल्ली येथे 18 - 22 मार्च 2024 दरम्यान भारताच्या वतीने आयोजित  ' अर्थव्यवस्थेत हायड्रोजन आणि इंधन सेलसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या ' 41 व्या सुकाणू समितीच्या बैठकीच्या (आयपीएचई) चौथ्या दिवशी, उद्योग  आउटरीच कार्यक्रमाचा भाग म्हणून हितसंबंधीतांसाठी सल्लामसलत   दिवस आयोजित करण्यात आला होता. 21 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश हा  स्वच्छ आणि हरित हायड्रोजन तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी महत्त्वाच्या हितसंबंधितांमध्ये सहकार्य आणि संवाद वाढवणे हा आहे.

भारतातील विपुल नवीकरणीय ऊर्जा  संसाधने आणि अनुकूल परिसंस्था पाहता,हरित हायड्रोजनमध्ये पुढील 20 वर्षांमध्ये देशाच्या ऊर्जा पुरवठा साखळीच्या संरचनेत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता असून याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल, असे  परराष्ट्र मंत्रालयाचे  विशेष सचिव (आर्थिक संबंध आणि विकास सहकार्य  प्रशासन)  पी कुमारन यांनी उद्योग  आउटरीच कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुदीप जैन यांनी हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम निदर्शनाला आणून देत या आव्हानावर मात करण्यासाठी त्वरित कृती करण्याची गरज अधोरेखित केली.

आयपीएचईचे उपाध्यक्ष डॉ. नो व्हॅन हल्स्ट यांनी हरित   हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.भारताने ही उद्दिष्टे साध्य केल्यास हे जागतिक हायड्रोजनसंदर्भातील घडामोडीनमध्ये देशाला आघाडीवर ठेवेल, असे ते म्हणाले.

भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव अजय यादव यांनी आयपीएचईचे अध्यक्ष  आणि इतर पाहुण्यांचे स्वागत केले आणि भारताच्या हायड्रोजन धोरणाच्या रुपरेषेचे  महत्त्व अधोरेखित केले.  यावेळी त्यांनी भारतातील हरित  हायड्रोजन कार्यक्षेत्रातील  विविध प्रकल्पांची यादी उपस्थितां समोर मांडली आणि   देशाच्या सर्व भागांमध्ये हरित  हायड्रोजन व्यवस्था हळूहळू विकसित होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

 

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016082) Visitor Counter : 64


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil