इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच निक्सी यांनी युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स म्हणजेच यूए दिनी, ‘भाषा नेट’ पोर्टलचा केला शुभारंभ

Posted On: 21 MAR 2024 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 मार्च 2024

इलेक्ट्रॉनिक्स-माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI), यांनी आज युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे निमित्ताने, भाषा नेट या पोर्टलचा शुभारंभ होत असल्याचे जाहीर केले. इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईनिंग नेम्स अँड नंबर्स (ICANN) या संस्थेच्या सक्रिय समर्थनातून हा कार्यक्रम संपन्न झाला. देशभरात डिजिटल समावेशन वाढवणे आणि इंटरनेटच्या युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्सला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना, भाषा नेट: युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स वर भर अशी असून त्याद्वारे, डिजिटल विश्वात कोणीही व्यक्ती- मग त्यांची भाषा, लिपी कुठलीही असली – तरीही सहभागी होऊ शकतील यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच, निक्सी करत असलेले प्रयत्न अधोरेखित केले जात आहेत.

या कार्यक्रमादरम्यान, चर्चासत्रे आणि कार्यशाळा झाल्या, ज्यात, भाषिणी, ओएनडीसी, एनआयसी, सी-डॅक मायक्रोसॉफ्ट, आयसीएएनएन चे यूएएसजी, डेटा एक्सजेन, इन्फीबीम, झोहो आणि फिक्कीच्या प्रतिनिधी सहभागी झाले होते. इंटरनेटचे युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स म्हणजेच सर्वसमावेशक स्वीकृती साध्य करण्यासाठी यावेळी त्यांनी विशेष सूचना आणि अनुभव सांगितले. इंटरनेट वर चालणाऱ्या सर्व व्यवस्था आणि उपकरणे, व्यापक प्रमाणात वापरली जावी, यासाठी सहभागी प्रतिनिधीसोबत, सर्वसामान्य लोकांनाही सक्षम करणे, हा या चर्चासत्रे आणि कार्यशाळांचा उद्देश होता.

भारताने, प्रादेशिक युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे चे यजमानपद यशस्वीपणे सांभाळले असून, याद्वारे आगामी जागतिक युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स डे साठीच्या नियोजनात भरीव मदत होणार आहे. हा कार्यक्रम, 28 मार्च 2024 रोजी सर्बियाच्या बेलाग्रेड इथे होणार आहे.

माहिती अणि तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रोनिक्स विभागाचे सचिव, एस. कृष्णन यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले, की युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स ही आज इंटरनेट वापरू इच्छित असलेल्या, मात्र इंग्रजी न बोलणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. भाषा किंवा लिपी कोणतीही असली तरी, इंटरनेट वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ आणि समन्वय सुनिश्चित केला पाहिजे असं ते पुढे म्हणाले. युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स अनुरूपतेच्या मानकांचे नेतृत्व करण्याच्या भारताच्या क्षमतेवरही त्यांनी भर दिला.

अधिक सर्वसमावेशक डिजिटल स्पेस निर्माण करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करत, आजचा मैलाचा टप्पा साजरा करण्यासाठी सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेते एकत्र आले होते.

भाषानेट आणि भविष्यातील उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया खालील लिंक वर क्लिक करा.  https://bhashanet.in/home.

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2016014) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil