सांस्कृतिक मंत्रालय
पुरालेखपालांच्या राष्ट्रीय समितीच्या सत्तेचाळीसाव्या बैठकीचे श्रीनगरमध्ये आयोजन
अभिलेखागारांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि ते सहज उपलब्ध करण्यासाठी डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे प्रतिपादन
Posted On:
20 MAR 2024 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 मार्च 2024
राष्ट्रीय पुरालेखपाल समितीची (NCA),सत्तेचाळीसावी बैठक, दिनांक 19 मार्च 2024 रोजी श्रीनगर येथील शेर-ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे आयोजित करण्यात आली होती.दोन दिवस चाललेल्या या बैठकीत दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील प्रतिनिधींनी वैयक्तिकरित्या सहभाग घेतला होता, तर हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रतिनिधी दृकश्राव्य पद्धतीने या बैठकीला उपस्थित होते.
दोन दिवस सुरू असलेल्या या बैठकीदरम्यान, प्रतिनिधींनी आपापल्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांतील अभिलेखागार प्रशासन आणि अभिलेखागार व्यवस्थापन प्रणालीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि त्यासाठी डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेण्याची गरज अधोरेखित केली.राष्ट्राच्या समृद्ध वारशाच्या दस्तावेजांचे जतन आणि सामायिकीकरण करण्यासाठी आणि वेब-पोर्टलद्वारे त्यांचे संग्रहण करून ही संसाधने सहज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित दृष्टिकोन स्वीकारण्यावर सर्वांनी यावेळी सहमती दर्शविली.
प्रतिनिधींनी अभिलेखांच्या डिजिटायझेशनच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यप्रणाली (SOPs) तयार करण्यासाठी नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडियाचे मार्गदर्शन मागितले.
एनएआयच्या सहकार्याने (NAI), राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक अभिलेखागारांचे स्रोतांचे मौखिक रीतीने आणि अपारंपारिक पध्दतीने एकत्रीकरण करणे यासारख्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यास देखील राष्ट्रीय पुरालेखपाल समितीने,या बैठकीत मान्यता दिली.
पुरालेखपालांच्या राष्ट्रीय समितीची पुढील बैठक या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणार आहे.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015712)
Visitor Counter : 92