अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष (FY) 2023-24 साठी एकूण प्रत्यक्ष कर संकलनाने नोंदवली 18.74% वृद्धी
Posted On:
19 MAR 2024 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 मार्च 2024
आर्थिक वर्ष 2023-24 (17.03.2024 पर्यंत) साठी जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, थेट कर संकलन 18,90,259 कोटी रुपये इतके आहे , जे मागील आर्थिक वर्षाच्या (आर्थिक वर्ष 2022-23), याच कालावधीमधील 15,76,776 कोटी रुपये कर संकलनाच्या तुलनेत 19.88% वृद्धी दर्शवत आहे.
18,90,259 कोटी रुपये (17.03.2024 रोजी) इतक्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनामध्ये, झालेला कर. 9,14,469 कोटी रुपये ( परतावा सह ), आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सह (STT.) वैयक्तिक आयकर 9,72,224 ( परतावा सह ), याचा समावेश आहे.
2023-24 या आर्थिक वर्षासाठी थेट कराच्या एकूण संकलनाची तात्पुरती आकडेवारी (परताव्यासाठी समायोजन करण्यापूर्वी) रु. 22,27,067 कोटी इतकी असून, मागील आर्थिक वर्षामधील (आर्थिक वर्ष 2022-23) याच कालावधीतील रु. 18,75,535 कोटीच्या तुलनेत 18.74% वृद्धी दर्शवत आहे.
22,27,067 कोटी रुपये इतक्या एकूण संकलनामध्ये कॉर्पोरेशन कर रु. 10,98,183 कोटी (निव्वळ परतावा), आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह (STT.) वैयक्तिक आयकर रु. 11,25,228 (निव्वळ परतावा), याचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 साठी (17.03.2024 पर्यंत) एकूण आगाऊ कर संकलनाची तात्पुरती आकडेवारी रु. 9,11,534 कोटी इतकी असून, मागील आर्थिक वर्षामधील (आर्थिक वर्ष 2022-23), याच कालावधीतील आगाऊ कर संकलन रु. 7,45,246 कोटी च्या तुलनेत 22.31% वृद्धी दर्शवत आहे. आगाऊ कर संकलन रु. 9,11,534 कोटी मध्ये कॉर्पोरेशन कर रु. 6,72,899 कोटी आणि वैयक्तिक आयकर (PIT) रु. 2,38,628 कोटी याचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 17.03.2024 पर्यंत परताव्या पोटी रु. 3,36,808 कोटी इतकी रक्कम जारी आली. आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीत परताव्या पोटी जारी करण्यात आलेल्या रु. 2,98,758 च्या तुलनेत यामध्ये 12.74% वृद्धी दिसून येत आहे.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015615)
Visitor Counter : 151