संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
द्विपक्षीय, प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य या मुद्यांवर केली चर्चा
Posted On:
18 MAR 2024 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 मार्च 2024
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य या मुद्यावर थोडक्यात चर्चा केली. त्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारत युनायटेड स्टेट्स डिफेन्स ऍक्सलरेशन इकोसिस्टिम (इंडस- एक्स) शिखर परिषद आणि आज भारतात सुरू झालेला 'टायगर ट्रम्फ' हा ट्राय-सर्व्हिस सराव या द्विपक्षीय कार्यक्रमांचा आढावाही घेतला.
हिंद महासागर क्षेत्रातील चाचेगिरीला लगाम घालण्यासाठी भारतीय नौदलाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक लॉईड यांनी केले. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करता येईल या विषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. भारतीय शिपयार्डमध्ये असलेल्या अमेरिकी नौदलाच्या जहाजांच्या दुरुस्तीसारख्या इतर संरक्षण उद्योग सहकार्याविषयीच्या मुद्यांवरही यावेळी थोडक्यात चर्चा झाली.
याआधी नवी दिल्ली येथे नोव्हेंबर 2023 मध्ये या दोघांनी मंत्रीस्तरीय संवाद साधला होता.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015434)
Visitor Counter : 94