संरक्षण मंत्रालय
लष्करी प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय कारणावरून अपात्र ठरलेल्या कॅडेट्सना पुनर्वसन सुविधा देण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची एक विशेष बाब म्हणून मंजुरी
पुनर्वसन महासंचालनालयाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ या कॅडेट्सना देण्यात येणार
Posted On:
18 MAR 2024 1:48PM by PIB Mumbai
लष्करी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या/जास्त वाढ होऊ शकणाऱ्या तंदुरुस्तीविषयक समस्यांमुळे वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरणाऱ्या कॅडेट्सना पुनर्वसन सुविधा देण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याच्या हेतूने कॅडेट्स अगदी तरुण वयात लष्करी अकादमींमध्ये प्रवेश घेत असतात आणि गणवेशात देशाची सेवा करण्याची वचनबद्धता प्रदर्शित करत असतात, मात्र, अपात्रतेमुळे दुर्दैवी ठरतात. अनेक दशकांपासून कॅडेट्स/त्यांचे पालक यांच्याकडून अशा प्रकारच्या पुनर्वसन संधींची मागणी केली जात होती.
दरवर्षी तरुण कॅडेट्स सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याच्या हेतूने, लष्करी अकादमींमध्ये शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षण घेत असतात. सध्या लागू असलेल्या नियमांनुसार केवळ नियुक्तीनंतरच अशा कॅडेटना अधिकारी हा दर्जा प्राप्त होतो. मात्र, काही वेळा काही घटनांमध्ये काही कॅडेट्स (वर्षाला 10 ते 20) खडतर लष्करी प्रशिक्षणामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या/ जास्त वाढ होऊ शकणाऱ्या तंदुरुस्तीविषयक समस्यांमुळे वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरतात.
अशा कॅडेट्सना जास्त संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी सैनिक कल्याण विभागाच्या आणखी एका प्रस्तावाला संरक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, ज्यानुसार त्यांना पुनर्वसन महासंचालनालयाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ दिले जाणार आहेत. वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरवण्यात आलेल्या 500 कॅडेट्सना या मंजुरीमुळे योजनांचे लाभ मिळणार आहेत आणि उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होणार आहे. अशाच परिस्थितीतील भावी कॅडेट्सना देखील हेच लाभ लागू होतील.
***
SonalT/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015381)
Visitor Counter : 106