माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चित्रपटगृहांमधील चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनादरम्यान सुगम्यता मानकांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे सरकारने केली अधिसूचित

Posted On: 15 MAR 2024 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2024

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने श्रवण आणि दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनादरम्यान सुगम्यता मानकांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे श्रवण आणि दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींचा समाजाच्या मुख्य प्रवाहात समाजात समावेश करून चित्रपटाचा पूर्ण अनुभव घेण्याचा मार्ग प्रशस्त होईल.

सुगम्यता मानकांच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • श्रवण आणि दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी चित्रपटांची सुगम्यता  सुनिश्चित करणे
  • व्यावसायिक कारणांसाठी सिनेमा गृह /चित्रपटगृहांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांसाठी लागू.
  • सुगम्यता मानके केवळ चित्रपट आशयासाठीच परिभाषित केलेली नाहीत, तर सहाय्यक उपकरणे आणि चित्रपटगृहातील पायाभूत सुविधांसाठी  देखील आहेत आणि  श्रवण  आणि दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींना सिनेमागृहात  चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुगमतेसाठी  जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा समावेश   करण्यात आला आहे.
  • अनिवार्य सुगम्यता  वैशिष्ट्ये: श्रवणदोष आणि दृष्टिदोषांसाठी प्रत्येकी किमान एक सुगम्यता  वैशिष्ट्य, म्हणजे ऑडिओ डिस्क्रिप्शन आणि क्लोज्ड  कॅप्शनिंग

अतिरिक्त सुगम्यता  वैशिष्ट्ये:

  • "भारतीय सांकेतिक भाषा" दुभाष्यांद्वारे भारतीय सांकेतिक भाषेचा अर्थ पिक्चर-इन-पिक्चर पद्धतीने  प्रदान करणे आवश्यक आहे आणि ते अचूक, समक्रमीत  केलेले असणे आवश्यक आहे आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींपर्यंत स्पष्ट संदेश पोहचवणे  आवश्यक आहे.
  • प्रदर्शक कृती योजना: चित्रपटगृह मालक दिव्यांग हितधारकांशी सल्लामसलत करून, सुगम्यतेसाठी स्वयं-नियामक योजना विकसित करतील आणि 2 वर्षांच्या आत सुगम्यता वैशिष्ट्ये लागू करतील.
  • देखरेख समिती: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेली समर्पित समिती, जिचे निम्मे सदस्य श्रवण/दृष्टी दोष  असलेल्या व्यक्ती आणि चित्रपट उद्योगातील प्रतिनिधी असून ते सुगम्यता मानकांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील आणि मार्गदर्शन करतील.
  • तक्रार निवारण: सुगम्यता वैशिष्ट्ये उपलब्ध नसल्यास  प्रेक्षक चित्रपटगृह  परवानाधारकांकडे तक्रारी देखील दाखल करू शकतात. आणि समिती त्यांच्या समस्या 30 दिवसांच्या आत परवाना प्राधिकरणाच्या माध्यमातून दूर करेल.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2015108) Visitor Counter : 88