संरक्षण मंत्रालय
पोर्ट लुईसच्या भेटीदरम्यान प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रनने द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत केले
Posted On:
15 MAR 2024 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2024
आय एन एस तीर आणि सी.जी.एस. सारथी यांचा समावेश असलेल्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वाड्रनने त्यांच्या दीर्घकालीन प्रशिक्षण तैनातीचा भाग म्हणून पोर्ट लुईस, मॉरिशसला भेट दिली. मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाच्या अनुषंगाने झालेल्या या भेटीमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील घनिष्ठ सागरी संबंध अधोरेखित झाले. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन संचलनात नौदलाची एक तुकडी आणि हेलिकॉप्टर सहभागी झाले होते, या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.
मॉरिशसच्या सागरी हवाई पथकाला आणि पोलीस हेलिकॉप्टर स्क्वाड्रनला भेट देणाऱ्या भारतीय नौदलाच्या प्रशिक्षणार्थींसाठी ही भेट समृद्ध अनुभव देणारी होती. आंतर प्रशिक्षण भेटीचा एक भाग म्हणून, मॉरिशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलाच्या जवानांना 1TS जहाजांवर लहान शस्त्रे आणि अग्निशमन बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. या भेटीमुळे PASSEX आणि VBSS सरावांमधील आंतरकार्यक्षमता आणखी वाढली. पोर्ट लुईसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मॉरिशस तटरक्षक दल डॉर्नियरसह 1TS द्वारे संयुक्त EEZ देखरेख देखील हाती घेण्यात आली होती.
हा दौरा प्रादेशिक सुरक्षेसाठी दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अधोरेखित करतो आणि भारत आणि मॉरिशस यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध अधोरेखित करतो.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015015)
Visitor Counter : 73