रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधील पालनपूर येथील राष्ट्रीय महामार्ग 58 वरील खोखरा गुजरात सीमा- विजयनगर- अंटारसुबा- माथासुर मार्गाच्या अद्ययावतीकरणासाठी 699.19 कोटी रुपयांच्या निधीला दिली मंजुरी
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2024 2:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2024
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातच्या पालनपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 58 वरील खोखरा गुजरात सीमा - विजयनगर - अंटारसुबा - माथासुर मार्गाचे पीएस (पेव्हड शोल्डर) सह दुपदरीकरण करण्यासाठी मिश्र वार्षिक तत्त्वावर 699.19 कोटी रुपयांची मंजुरी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग- 58 गुजरात आणि राजस्थान तसेच अंबाजी मंदिर, उदयपूर, पोलो वन आणि इतर पुरातत्त्वीय स्मारके तसेच विविध पर्यटन स्थळांना जोडतो, असे ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग - 58 च्या या टप्प्यात विद्यमान एकेरी / दुहेरी मार्गिकेचा रस्ता पीएससह दुपदरी करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यात डोंगराळ भागातून जाणाऱ्या 14 पट्ट्यांमध्ये पुनर्संरेखन समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे या भागात अधिक चांगली संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असे गडकरी म्हणाले.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2014890)
आगंतुक पटल : 113