रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकात हासन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग- 373 मधील येडेगौडनहळ्ळी ते अर्जुनहळ्ळी या खंडाच्या चौपदरीकरणासाठी नितीन गडकरी यांनी 576.22 कोटी रुपये केले मंजूर

Posted On: 15 MAR 2024 11:31AM by PIB Mumbai

कर्नाटकात हासन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग- 373 मधील येडेगौडनहळ्ळी ते अर्जुनहळ्ळी या  22.3 किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी 576.22 कोटी रुपयांच्या तरतूदीला मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका समाज माध्यम संदेशात ही माहिती दिली आहे.


हा मार्ग चिकमंगलूर, बेलूर, हलेबीडू आणि श्रवणबेळगोळासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे, असे ते म्हणाले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे संपर्क व्यवस्था उंचावेल, पर्यटनाला आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला  चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2014883)