रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
झारखंडमधील खुंटी येथे 2500 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या अद्ययावतीकरणाची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2024 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून झारखंडच्या विकासाला चालना देण्यासाठी, झारखंडमधील खुंटी येथे काल आयोजित कार्यक्रमात 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमांवरील एका पोस्टमध्ये दिली आहे . केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, ज्येष्ठ नेते करिया मुंडा, सुदर्शन भगत, खासदार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही पायाभरणी केली.
ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यात तुपुदाना ते कुंदियाबार्टोली विभाग (खुंटी बाह्यवळण मार्गासह) रस्त्याचे चौपदरीकरण आणि बेरो ते खुंटी विभागाचे रुंदीकरण आणि सुधारणा यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. बेरो ते खुंटी या विभागाच्या रस्ते बांधकामामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाला चालना मिळेल.खुंटी बाह्यवळण मार्गाच्या बांधकामामुळे स्थानिक उत्पादने बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे होईल, ज्यामुळे या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांमुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असून त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. आधुनिक आणि उच्च दर्जाचे रस्ते सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतील.आर्थिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल आणि रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
* * *
NM/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2013387)
आगंतुक पटल : 123