कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ, येथे सुरू होत आहे”: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
10 MAR 2024 4:49PM by PIB Mumbai
"उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा भागात उभारले जाईल", अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज कठुआ येथे दिली. केंद्र सरकारच्या निधीतील 80 कोटी रुपये खर्च करून हे महाविद्यालय उभारले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सातत्याने विकासाची वाटचाल सुरू ठेवत डॉ जितेंद्र सिंह यांनी आज जसरोटा गावातील महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेला भेट दिली. सध्या या जागेवर कुंपण भिंतीचे काम सुरू झाले आहे. या वेळी आयुष विभागातील अभियंते आणि वरिष्ठ तज्ञांनी मंत्र्यांना संस्थेबाबत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर या महाविद्यालयाची मागणी मांडली होती असे सिंह यांनी सांगितले. ती पंतप्रधानांनी मान्य केल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. 70-80 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले, उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कठुआच्या लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. ही संस्था 8 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर विस्तारित असून शेजारील तीन एकर क्षेत्र देखील योग्य वेळेत महाविद्यालयाच्या जागेबरोबर जोडले जाईल, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
***
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013287)
Visitor Counter : 108