अर्थ मंत्रालय

नवी दिल्लीत आयोजित राज्यांच्या आणि केंद्रीय जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन


हितधारकांच्या समस्या समजून घेणे, अनुपालन वाढवणे, प्रक्रियेत सुसूत्रता आणणे आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सहकार्याने कार्यरत राहण्याच्या अनुषंगाने हितधारकांशी समन्वय राखण्याचे अर्थमंत्र्यांचे जीएसटी अधिकाऱ्यांना आवाहन

Posted On: 04 MAR 2024 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मार्च 2024

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत आयोजित राज्यांच्या  आणि केंद्रीय जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.वेगवेगळ्या अप्रत्यक्ष कर प्राधिकरणांनी केलेल्या अंमलबजावणीच्या कृतींमध्ये कर अधिकाऱ्यांचे कार्य समजून घेणे आणि सुसूत्रता आणण्याच्या  दिशेने परिषदेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

या उद्घाटन कार्यक्रमात केलेल्या आपल्या भाषणात, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून जीएसटीला विश्वासार्ह, ध्येयाभिमुख आणि सक्षम प्रणाली बनवण्यासाठी  जीएसटी निर्मितीसाठी 2017 पासून केंद्र आणि राज्यांच्या केलेल्या अथक प्रयत्नांची प्रशंसा केली.

त्रुटी दूर करण्यासाठी तसेच करदात्यांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी  तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ्यमंत्र्यांनी सर्व जीएसटी विभागांना केलें. नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित करून केंद्रीय मंत्र्यांनी मोठ्या राष्ट्रीय हितासाठी राज्यांमध्ये अखंड समन्वयाच्या गरजेवर भर देत, उदयोन्मुख सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचे समर्थन केले.

  

सीतारामन यांनी केंद्र आणि राज्यांच्या अंमलबजावणी प्रमुखांमध्ये नियमितपणे अशा बैठका घेण्याच्या आणि अडथळ्यांवर चर्चा करण्यासाठी, यशस्वी धोरणांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि अधिक मजबूत आणि सामंजस्यपूर्ण कर पायाभूत सुविधांच्या दिशेने एकत्रितपणे प्रगती करण्यासाठी या व्यासपीठाचा लाभ घेण्याच्या महत्त्वावर भर दिला.

वर्गीकरण संबंधित समस्यांवरील स्पष्टता योग्य मार्गाद्वारे  लवकरात लवकर पाहिली पाहिजे.यावरही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भर दिला. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून व्यवस्था स्वच्छ आणि अधिक प्रभावी बनवता येतात हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांनी हे दाखवून दिले आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

   

हितसंबंधितांच्या समस्या समजून घेण्यासाठी, अनुपालन वाढवण्यासाठी, प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी  आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सहकार्याने कार्यरत राहण्याच्या अनुषंगाने  त्यांच्याशी समन्वय राखण्याचे  आवाहन सीतारामन यांनी जीएसटी अधिकाऱ्यांना केले.महाराष्ट्र राज्य जीएसटीने  संशयित गैर वास्तविक   करदात्यांचे (एनजीटीपी ) प्रत्यक्ष वेळेत  देखरेख  करण्यासाठी  डॅशबोर्ड प्रदर्शित केले आहेत .29 फेब्रुवारी 2024 पर्यंत, राज्याने 41,601 संशयित एनजीटीपी ओळखले आहेत त्यापैकी 6,034 एनजीटीपी आढळले आहेत. नोंदणी दरम्यान गोळा केलेली विविध गुप्त माहिती,, ई-वे देयके आणि सीबीआयसी/इतर राज्यांकडून मिळालेल्या माहितीवर तपास आधारित होता आणि प्रारंभिक टप्प्यावर शोधाचा वेग वाढवण्यासाठी उचललेली पावले अधोरेखित करण्यात आली.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011427) Visitor Counter : 75


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu